शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

CoronaVirus Live Updates : लढ्याला यश! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,273 नवे रुग्ण, 243 मृत्यू; पॉझिटिव्हिटी रेट 1 टक्क्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 10:13 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहेत. प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. पॉझिटिव्हिटी रेट देखील कमी झाला आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे दहा हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशभरात तब्बल 5 लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा 5,13,724 वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (27 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,273 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. लाखो लोकांनी कोरोनावर मात केली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर हा एक टक्क्यावर

देशामधील सक्रिय रुग्णांची संख्या 1,11,472 वर पोहोचली आहे. तर 4,22,90,921 जण कोरोनातून बरे झाले आहेत. दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर हा एक टक्क्यावर पोहोचला आहे. तर आठवड्याचा 1.36 टक्क्यांवर आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाची प्रकरणे कमी केल्यानंतर दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संसर्ग रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. डीडीएमएच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डीडीएमए बैठकीत सांगितले की, आता कोरोना नियंत्रणात आहे आणि दिल्लीत सर्व काही सुरू केलं पाहिजे. दिल्लीतील कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर एक एप्रिलपासून सर्व शाळा पूर्णपणे सुरू होणार आहेत.

दिल्लीमध्ये कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे; नाईट कर्फ्यू, मास्कबाबत केली 'ही' मोठी घोषणा

दिल्लीतील कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह दर एक टक्क्यापेक्षा कमी झाल्यास दिल्लीतील रात्रीचा कर्फ्यू सोमवारपासून संपणार आहे, सध्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीनंतर दिल्लीत मास्क न घालण्याचा दंडही कमी करण्यात आला आहे. मास्क न घातल्याबद्दल 2000 रुपयांचा दंड कमी करून 500 रुपये करण्यात आला आहे. डीडीएमएने दिल्लीत बस आणि मेट्रोमध्ये उभे राहून प्रवास करण्याची परवानगीही दिली आहे. यासोबतच दुकाने उघडण्याची आणि बंद करण्याची मुदतही संपणार आहे. याशिवाय रेस्टॉरंट्स उघडण्यासाठी वेळेची मर्यादा नसेल आणि रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत सुरू राहू शकतील.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस