शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

CoronaVirus Live Updates : लस घेतल्यानंतर 'ही' लक्षणं आढळून आल्यास असू शकतो कोरोनाचा धोका; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 3:04 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. मात्र लस घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 39,361 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 416 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,20,967 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. मात्र लस घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. 

निष्काळजीपणामुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. लस घेतल्यानंतरही कोणती लक्षणं आढळून येतात. यापासून कसा बचाव करायचा हे जाणून घेऊया. डॉक्टरांनी याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांना वाटतं संसर्ग होत नाही. मात्र असं काही नाही. लागण होऊ शकते. कोरोना लस घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही घशात खवखव होणं, वास न येणं, डोकेदुखी, शिंका येणं अशी काही लक्षणं आढळून येत असल्याचं दिसून येत आहेत. कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतरही मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे.

घरी राहून स्वत:ची काळजी घ्या, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. सोशल डिस्टंसिंगचं पालन करा. आपले हात साबण आणि सॅनिटायझरच्या मदतीने नेहमी स्वच्छ करत राहा. बाहेरून घरी आल्यानंतर अंघोळ करा. सार्वजनिक ठिकाणी, दुकान, मॉल, ऑफिसमध्येही कोरोना नियमावलीचं पालन करा, लहान मुलांची विशेष काळजी घ्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. फायजर-बायोएनटेक लसीच्या दोन डोसमध्ये अधिक अंतर ठेवल्यास अँटीबॉडी आणि टी-सेल विकसित रोगप्रतिकारक शक्ती वाढणार असल्याचं ब्रिटीश संशोधकांनी म्हटलं आहे. रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे.

कोरोना लसीच्या दोन डोसमध्ये नेमकं किती अंतर ठेवणं योग्य?; रिसर्चमधून करण्यात आला मोठा दावा

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नेतृत्वात बर्मिंघम, न्यू कॅसल, लिव्हरपूल आणि शेफिल्ड विद्यापीठांनी आणि ब्रिटन कोरोना व्हायरस इम्यूनोलॉजी कंसोर्टियमच्या मदतीने फायजर-बायोएनटेकच्या लसीबाबत सखोल संशोधन करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, टी सेल आणि अँटीबॉडीचा स्तर पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये अंतर ठेवले तरी अधिक असल्याचं संशोधकांना आढळून आले आहे. जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, लसीचे दोन डोस घेण्याच्या दरम्यानच्या काळात कोरोनापासून बचाव होतो आणि लसीच्या दुसऱ्या डोसची आवश्यकता आहे. शेफील्ड विद्यापीठाच्या संसर्गजन्य आजाराचे वरिष्ठ चिकित्सा प्रवक्ते आणि प्रमुख संशोधक डॉ. तुषाण डी सिल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्स-सीओव्ही-2 लसीनंतर अँटीबॉडी आणि टी-सेलचे आकलन या संशोधनात करण्यात आले. या संशोधनात 503 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या