शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४००० पार, २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 10:23 IST

CoronaVirus : गेल्या २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६९३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.

नवी दिल्ली : भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा संख्या वाढत चालली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या रुग्णांचा संख्या ४ हजारहून अधिक झाली आहे.

भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू झाला असून ४०६७ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर २३२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६९३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपोययोजना सुरु आहे. तसेच, कोरोनावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे.

रविवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाची ५०५ लोकांना बाधा आणि ११ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यासोबतच रविवारी देशातातील कोरोनाची संख्या ३,५७७ इतकी होती, तर ८३ लोकांचा मृत्यू झाला होता.

याचबरोबर, महाराष्ट्रात रविवारी २४ तासांत कोरोनाच्या ११३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तसेच, रविवारी कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा ४६ वर जाऊन पोहोचला.

शाळा, कॉलेज उघडण्याचा निर्णय १४ एप्रिलनंतरचकोरोनामुळे बंद केलेली देशभरातील शाळा-कॉलेजे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिलला संपल्यावर परिस्थिती कशी आहे, याचा आढावा घेऊनच केला जाऊ शकेल, असे केंद्रीय मानवसंधान विकासमंत्री रमेश पोखरीयाल यांनी म्ह्टले आहे. ते म्हणाले की, सरकारच्या दृष्टीने विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षा ही सर्वोच्च बाब आहे. १४ एप्रिलनंतरही शाळा-कॉलेजे बंद ठेवावी लागली तरी विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत