शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कर्नाटक राज्य कोरोनाच्या लढाईतही दहावी पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 06:52 IST

कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दरवर्षी बारावीची परीक्षा ४ मार्च, तर दहावीची परीक्षा २६ मार्चला सुरू करण्यात येते. बारावीची इंग्रजी वगळता सर्व विषयांची परीक्षा पूर्ण झाली आणि लॉकडाऊन जाहीर झाला.

साडेआठ लाख विद्यार्थी, हवे तेथे परीक्षा, सर्वांसाठी मोफत एसटीची सोय, शिक्षण विभागाकडून पुरेपूर खबरदारी- वसंत भोसलेकोल्हापूर : गेली अनेक दशके वेळेवर परीक्षा घेणाऱ्या कर्नाटक राज्याला कोरोनाशी लढताना दहावीच्या परीक्षेची फेरआखणी करावी लागली आणि अशाही परिस्थितीत परीक्षा घेऊन एका महिन्यात निकाल जाहीर केला. नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे अर्ज दाखल करून घेऊन १५ सप्टेंबरच्या पुरवणी परीक्षेची तयारीदेखील पूर्ण झाली आहे.कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दरवर्षी बारावीची परीक्षा ४ मार्च, तर दहावीची परीक्षा २६ मार्चला सुरू करण्यात येते. बारावीची इंग्रजी वगळता सर्व विषयांची परीक्षा पूर्ण झाली आणि लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी इंग्रजीचा पेपर १९ जुलैला होऊन निकालही जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेचे फेरवेळापत्रक जाहीर करण्यात आले. दक्षिणेतील तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूने अद्याप परीक्षा घेतलेल्या नाहीत. केरळने २६ ते ३१ मे दरम्यान परीक्षा घेऊन निकाल जाहीर केला.कर्नाटकाने दहावीच्या परीक्षेची जंगी तयारी केली. परीक्षा केंद्रे वाढविली. प्रत्येक मुला-मुलींस जवळच्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येईल, असे जाहीर केले. एका वर्गात केवळ २४ विद्यार्थी बसवून शारीरिक अंतराचा नियम पाळण्यात आला. परीक्षेला किमान दोन तास आधी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. सर्वांचे तापमान पाहणे, सॅनिटायझेशन करणे, मास्क नसेल तर देणे, आदी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. आजाराची लक्षणे आढळून आल्यास स्वतंत्र खोलीत बैठक व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेला बसणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक प्रवास करण्यासाठी राज्यभर मोफत बससेवा उपलब्ध करून दिली होती.प्रत्येक गावातील मुला-मुलींना परीक्षा केंद्राची निवड करायला सांगितले. आॅनलाईनवर वेळापत्रक देण्यात आले. परीक्षा केंद्र, नाव आणि नंबर मोबाईल तसेच अ‍ॅपवर कळविण्यात आले. प्रवासाची गरज असल्याची माहिती जमा करून त्या त्या ठिकाणी बस पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.शिक्षण खात्याशिवाय पोलीस कर्मचारी, आरोग्य खात्याचे कर्मचारी, स्काऊट तसेच होमगार्डस्, आदींची मदत घेण्यात आली. प्रत्येक मुलाची तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. हसन जिल्ह्यातील अलकेरी गावच्या एका परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला अन्यथा संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडली. २५ जून ते ४ जुलैअखेर परीक्षा पार पडली आणि १० आॅगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात परीक्षा घेण्यास विरोध केला जात असतानाच आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्याने मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या जोराच्या संक्रमण काळातच पूर्ण खबरदारी घेत परीक्षा पार पाडली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकEducationशिक्षणexamपरीक्षा