शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Covid New Variant JN 1: अलर्ट राहा, घाबरू नका! केंद्र सरकारकडून लोकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 07:40 IST

दर तीन महिन्यांनी सर्व रुग्णालयांमध्ये 'मॉक ड्रिल' करण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्र्यांनी सूचना केल्या

नवी दिल्ली - Coronavirus in India ( Marathi News ) दक्षिणेतील अनेक राज्यासह देशात कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांच्यासह विविध राज्यांतील आरोग्य मंत्री, उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. यात चाचण्या वाढवणे, आरोग्य यंत्रणा मजबूत करणे यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, घाबरण्याची नाही असं या बैठकीत आरोग्य मंत्री मांडविया यांनी म्हटलं. 

केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, चीन, ब्राझील, जर्मनी आणि अमेरिकेतील कोविड रुग्णात झालेली वाढ पाहता आपल्याही कोविडच्या नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी तयार राहावे लागेल. सणांचे दिवस पाहता सतर्कता आवश्यक आहे. कोविड अद्याप संपलेला नाही. देखरेख ठेवा. केंद्राकडून राज्यांना पूर्ण मदत केली जाईल. राज्यांनी कोविड चाचण्या वेगाने कराव्यात.कोविड पॉझिटिव्ह आणि निमोनियासारख्या आजारांचे जास्तीत जास्त नमुने दररोज INSACOG तपासणीसाठी पाठवा जेणेकरून जीनोम सिक्वेसिंगमधून नव्या व्हेरिएंटचा शोध घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं. 

तसेच रुग्णालयाच्या तयारीसाठी 'मॉक ड्रील' करणे, निगराणी वाढवणे आणि लोकांशी बोलणे आवश्यक आहे. दर तीन महिन्यांनी सर्व रुग्णालयांमध्ये 'मॉक ड्रिल' करण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्र्यांनी सूचना केल्या. तर जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोविडचे सक्रिय रुग्ण खूपच कमी आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी बैठकीत दिली.

९२% पेक्षा जास्त रुग्ण घरीच बरे होतायेत, सौम्य आजाराचे लक्षणनीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की, सध्या देशात कोविड सब-व्हेरियंट JN.1 चे २१ प्रकरणे आहेत. देशात कोविडचे २३११ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी ५१९ प्रकरणे नोंदवली गेली. नवीन व्हेरिएंटबद्दल घाबरण्याची गरज नाही, कारण हा व्हेरिएंट अधिक संक्रमक असला तरी आजार सौम्य आहे. सर्दी-खोकला होतो.मागील दोन आठवड्यात १६ लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु या लोकांना आधीच इतर अनेक गंभीर आजार होते. काहींना हृदयविकार तर काहींना कर्करोग झाला होता. कोविड त्याचे रुप बदलतो. देशाला सतर्क राहावे लागेल असं त्यांनी म्हटलं. 

नव्या व्हेरिएंटचे आतापर्यंत २१ रुग्णेआतापर्यंत देशात कोविड JN.1 च्या नवीन सब व्हेरिएंटचे २१ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १८ गोव्यातील आहेत. या व्हेरिएंटबाबत आणखी सखोल तपास सुरू आहे. परंतु सध्या चिंतेचे कारण नाही. या व्हेरिएंटचे रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे झाले आहेत. भारतातील वैज्ञानिक या नवीन व्हेरिएंटचा तपास करत आहेत. ICMR या व्हेरिएंटच्या जीनोम चाचणीवर काम करत आहे. सूत्रांनुसार,हा व्हेरिएंट कोविडच्या वाढत्या प्रकरणांचे कारण आहे. अधिक जीनोम चाचणी केली जात असल्याने, या व्हेरिएंटची रुग्णसंख्या वाढेल. आता दिलासादायक बाब म्हणजे, लक्षणे सौम्य आहेत आणि रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी होत आहे. ८ डिसेंबर रोजी केरळमध्ये त्याचा पहिला रुग्ण सापडले. ७९ वर्षीय महिलेच्या RT-PCR चाचणीत आढळून आला. ती देखील आता बरी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत