शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

Coronavirus: चिंताजनक! सर्वात कमी वयाचा भारतात पहिलाच बळी; कोरोनामुळे २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 12:34 IST

गोरखपूर येथे जी टेस्ट करण्यात आली होती त्यानुसार या युवकाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी मिळाली.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पहिल्या कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. इतक्या कमी वयात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची देशात पहिली घटनाबस्ती जिल्ह्यातील युवकाच्या घराला आणि परिसराला केलं सील

नवी दिल्ली – संपूर्ण जगासह देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या १२०० च्या वर पोहचली आहे तर ३० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. केरळ, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. कोरोनामुळे ज्येष्ठ आणि बालकांच्या जीवाला सर्वाधिक धोका असल्याचं बोललं जात होतं. पण उत्तर प्रदेशात एका युवकाच्या मृत्यूने चिंता वाढली आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पहिल्या कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशात कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. बस्ती येथील २५ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. इतक्या कमी वयात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची देशात पहिली घटना आहे. लखनऊच्या केजीएमयूचे मीडिया समन्वयक डॉ. सुधीर सिंह यांच्या माहितीनुसार, गोरखपूर येथे जी टेस्ट करण्यात आली होती त्यानुसार या युवकाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी मिळाली. बीआरडी मेडिकल कॉलेजच्या कोरोना वार्डात या युवकावर उपचार सुरु होते.

सोमवारी या युवकाचा मृत्यू झाला त्यानंतर पोस्टमार्टममध्ये या युवकाच्या मृत्यूचं कारण कोरोना असल्याचं सांगितलं गेलं. या बातमीनं गोरखपूर परिसरात खळबळ उडाली आहे. या रिपोर्टला केजीएमयूमध्ये पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं. मृत व्यक्ती बस्ती जिल्ह्यातील राहणारा आहे.  प्रशासनाकडून या युवकाच्या घराला आणि आसपासच्या परिसराला सील करण्यात आलं आहे. या युवकाच्या शेजारील राहणाऱ्या लोकांचे नमुने तपासले जात आहेत. परिसरात सॅनिटायझरने फवारणी करण्यात आली आहे. मृतकाच्या नातेवाईकांना आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. हा युवक काही दिवसांपूर्वी परदेशातून आल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

दरम्यान, रविवारपासून देशात ९२ नवे रुग्ण समोर आले असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. त्यानंतर, मंगळवारी यामध्ये आणख वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या २४ तासांत देशातील २२७ कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकरणे समोर आली आहेत. देशातील १५२३ रुग्णांपैकी १०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, एक रुग्ण स्थलांतरील आहे. सध्या १११७ रुग्णांवर उपचार सुरू असून ते वैद्यकीय तपासणीखाली आहेत तर ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिका, युरोप कोरोनसमोर हतबल, जगभरात कोरोनामुळे 42 हजार जण मृत्युमुखी

धक्कादायक! कोरोनाचा खुलासा करणारी महिला डॉक्टर अचानक बेपत्ता; चीन सरकारवर संशय

चिंताजनक! भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी

‘प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला’

तबलिगी जमातच्या कार्यक्रमात पुण्यातील 92 लोकांचा सहभाग; 35 जणांना नायडू रुग्णालयात केले दाखल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या