नवी दिल्ली: देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असूनही कोरोना बाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ६० हजारांच्या पुढे गेली आहे. यामुळे भारताच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदला गेला आहे. आशियातील देशांचा विचार केल्यास कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या जगातील केवळ आठच देशांमधील कोरोना रुग्णांचा आकडा भारतापेक्षा जास्त आहे.worldometers.info हे संकेतस्थळ जगभरातल्या कोरोनाबाधितांची आकडेवारी देतं. भारतात सध्याच्या घडीला कोरोनाचे १ लाख ६० हजार ३१० रुग्ण आहेत. आशिया खंडात इतकी रुग्णसंख्या कोणत्याही देशात नाही. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आतापर्यंत १ लाख ५८ हजार ३३३ रुग्ण सापडल्याची माहिती दिली आहे. यातील ६७ हजार ६९१ जण बरे झाले असून ४ हजार ५३१ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी मंत्रालयानं दिली.
CoronaVirus News: ...अन् भारत 'त्या' यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला; नावावर नकोसा विक्रम नोंदला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 22:48 IST