शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Coronavirus : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र अलर्ट; परिस्थिती पाहून सूट देण्याच्या राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 10:51 IST

Coronavirus Third Wave : अनेक राज्यांनी सूट दिल्यानंतर रस्त्यांवर दिसून येत आहे गर्दी. कोरोनाविषयक सूचनांचं पालन होत नसल्याचं चित्र.

ठळक मुद्देअनेक राज्यांनी सूट दिल्यानंतर रस्त्यांवर दिसून येत आहे गर्दी.कोरोनाविषयक सूचनांचं पालन होत नसल्याचं चित्र.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. यानंतर अनेक राज्यांमध्ये पुन्हा निर्बंध लादण्यात आले होते. दरम्यान, अनेक राज्यांनी निर्बंध लागू केल्यानंतर रुग्णाच्या संख्येत मोठी घटही दिसून आली. परंतु अनेक लोकांच्या कामावरही याचा परिणाम झाला. यानंतर रुग्णसंख्या कमी होत असल्यानं अनेक राज्यांनी पुन्हा सूट देण्यास सुरूवात केली. परंतु सूट दिल्यानंतर पुन्हा एकदा अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. 

केंद्र सरकारनं रस्त्यांवरील वाढती गर्दी पाहता पुन्हा एकदा राज्यांना इशारा दिला आहे. तसंच ही सूट योद्य ती काळजी घेऊन विचारपूर्वक दिली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्रानं राज्य सरकारांना कोविड अॅप्रोप्रिएट बिहेविअरची पाच स्तरीय रणनितीचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्ट, ट्रॅक-ट्रीट आणि लसीकरणाला चालना देण्याच्याही सूचना केल्या आहेत.

केंद्राचं राज्यांना पत्रकोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शनिवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राज्यांना टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या रणनितीचा वापर करण्यास सांगितलं आहे. तसंच टेस्टींग रेट कमी होऊ नये अशाही सूचना केल्या आहेत. याशिवाय राज्यांमध्ये लसीकरणही वाढवण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

"संबंधित ठिकाणची परिस्थिती पाहूनच निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली पाहिजे. बाधितांची संख्या कमी झाल्यानंतर सूट देणं आवश्यक आहे, परंतु सतर्कता बाळगणंही आवश्यक आहे. सूट देताना कोरोना नियमांचं पालन केलं जाणंही आवश्यक आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि लसीकरण हे आवश्यक आहे. नियमांचं पालन केलं जातंय का नाही यासाठी देखरेख ठेवणंही आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आणि बंद जागांवर योग्य वेंटिलेशन या गोष्टीही आवश्यक आहे," असं गृह सचिवांनी नमूद केलं. 

... तर ६-८ आठवड्यात तिसरी लाटदेशात येत्या सहा ते आठ आठवड्यांच्या आत कोरोना साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असं ‘एम्स’चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. प्रतिबंधक निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पुन्हा निष्काळजीपणे वावरू लागले आहेत, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. 

"कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कालावधीत लोकांनी प्रतिबंधक नियमांचे नीट पालन केले नाही. या हलगर्जीपणामुळे कोरोना संसर्गास अधिक वाव मिळाला व रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर बहुतांश लोक प्रतिबंधक नियम नीट पाळताना दिसत नाहीत. अनेक ठिकाणी पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. असेच चित्र राहिले तर ही साथ आणखी वेगाने पसरू शकते," असं गुलेरिया म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतGovernmentसरकारAIIMS hospitalएम्स रुग्णालय