शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

Coronavirus: देशातील दैनंदिन रुग्णवाढ पुन्हा लाखाच्या आत, पण मृतांच्या संख्येने केले सर्व रेकॉर्ड ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 10:02 AM

Coronavirus in India: गेल्या २४ तासांमध्ये देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढीची संख्या ही एक लाखाच्या आतच राहिली आहे. मात्र याच दिवसभरात मृतांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली - मार्च ते मे या तीन महिन्यांच्या काळात देशात धुमाकूळ घालणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. (Coronavirus in India) गेल्या २४ तासांमध्ये देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढीची संख्या ही एक लाखाच्या आतच राहिली आहे. मात्र याच दिवसभरात मृतांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (India reports 94,052 new Covid-19 cases, 1,51,367 discharges & 6148 deaths  in last 24 hrs)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे ९४ हजार ०५२ नवे रुग्ण सापडले आहेत. मात्र काल दिवसभरात देशात तब्बल सहा हजार १४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. एका दिवसात झालेली सहा हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद ही कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्यापासूनची एका दिवसातील सर्वांधिक मृत्यूंची नोंद आहे.  गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबळींची दैनंदिन संख्या सातत्याने घटत होती. गेले काही दिवस तर हा आकडा तीन हजारांच्याही खाली आला होता. मात्र काल एका दिवसांत झालेल्या सहा हजारांहून अधिक कोरोनाबळींच्या नोंदीमुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, गेल्या २४ तासांतील ९४ हजार ०५२ रुग्णांच्या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ही २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात झालेल्या ६ हजार १४८ मृत्यूंमुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबळींचा आकडा ३ लाख ५९ हजार ६७६ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, काल १ लाख ५१ हजार ३६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ एवढी झाली आहे. 

देशात सध्या ११ लाख ६७ हजार ९५२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर देशातील लसीकरणाचा वेगही वाढत असून, आतापर्यंत २३ कोटी ९० लाख ५८ हजार ३६० जणांना कोरोनावरील लसीचा डोस देण्यात आला आहे. 

दरम्यान, एका दिवसांत सर्वाधिक मृत्यूंची नोंद होण्यामागे बिहारमध्ये आरोग्य विभागाने कोरोनाबळींच्या संख्येत आधीच्या मृत्यूंची भर घालून केलेली वाढ हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये कोरोनाबळींच्या आकडेवारीत करण्यात आलेल्या सुधारणेमुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ५ हजार ४५८ वरून थेट ९ हजार ४२९ वर पोहोचली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत