शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : भारताने कोरोनाच्या नव्या लाटेशी केला समर्थपणे मुकाबला -नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 06:21 IST

Coronavirus: देश कोरोनाच्या नव्या लाटेशी समर्थपणे मुकाबला करत असून त्यात  मोठे यशही मिळाले आहे. स्वदेशी लसींवर नागरिकांनी दाखविलेला विश्वास हे भारताचे मोठे सामर्थ्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : देश कोरोनाच्या नव्या लाटेशी समर्थपणे मुकाबला करत असून त्यात  मोठे यशही मिळाले आहे. स्वदेशी लसींवर नागरिकांनी दाखविलेला विश्वास हे भारताचे मोठे सामर्थ्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यंदाच्या वर्षात ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मोदी बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येतही आता घट होऊ लागली असून ते सकारात्मक चिन्ह आहे. देशातील साडेचार कोटी मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी लसीकरण सुरू झाल्यापासून तीन ते चार आठवड्यांत १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे ६० टक्के मुलांना ही लस मिळाली. लोक सुरक्षित राहिले तरच दैनंदिन व्यवहार व आर्थिक घडामोडीही सुरू राहतील.मोदी यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सुरुवात आता दरवर्षी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून होईल व हा सोहळा महात्मा गांधी यांच्या ३० जानेवारीला असलेल्या स्मृतिदिनापर्यंत चालणार आहे. इंडिया गेट येथील अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीनीकरण केल्याचेही देशातील नागरिकांनी स्वागत केले आहे. पद्म पुरस्कार मिळालेल्यांपैकी अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात नाहीत. मात्र, अशा व्यक्तींच्या कार्याचा देशाच्या विकासात मोठा हातभार आहे.

काॅलरवाल्या वाघिणीबद्दल जिव्हाळा पेंच व्याघ्र प्रकल्पातील राणी या वाघिणीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तिने आजवर २९ पिल्लांना जन्म दिला होता.  गळ्यात कॉलर लावलेली असल्याने तिला काॅलरवाली वाघीण म्हटले जात असे. तिच्या मृत्यूनंतर देशातील असंख्य नागरिक हळहळले. त्याचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला. 

भारताला भ्रष्टाचारमुक्त करापंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भ्रष्टाचार हा वाळवीसारखा असून तो सारा देश पोखरतो. भ्रष्टाचारापासून भारताची मुक्तता करण्यासाठी सर्व नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndapurइंदापूर