शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : नोएडात गेल्या 7 दिवसांत 44 मुलांना कोरोनाची लागण, चिंता वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 12:45 IST

Coronavirus : लोकांना सतर्क राहून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढली आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडामध्ये (Noida) गेल्या 7 दिवसांत 44 मुलांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, लोकांना सतर्क राहून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेल्या 7 दिवसांत 44 मुलांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी 16 मुले 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. नोएडामध्ये कोरोनाचे एकूण 167 रुग्ण आहेत. बाधित मुलांची टक्केवारी 26.3 आहे, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुनील कुमार शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, याआधी गुरुवारी 15 मुलांसह कोरोना व्हायरसच्या 44 नवीन प्रकरणांची पुष्टी झाली होती. प्रशासनाकडून लोकांना मास्क लावण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितले जात आहे.

कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढलीदेशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 949 नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 4,30,39,972 झाली आहे. याचबरोबर, सक्रिय प्रकरणांची संख्या देखील 11,191 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनामुळे मृत्यूची आणखी 6 प्रकरणे समोर आल्यानंतर मृतांचा आकडा 5,21,743 वर पोहोचला आहे. 

गेल्या 24 तासांत कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 133 ने वाढली आहे. रिकव्हरी रेट 98.76 टक्क्यांवर गेला आहे. आकडेवारीनुसार, डेली कोरोना पॉझिटिव्ह रेट  0.26 टक्के आणि विकली पॉझिटिव्हिटी रेट 0.25 टक्के झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक रुग्णांना इतर आजारही होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशHealthआरोग्य