शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

Coronavirus: 'मेड इन पुणे'... एका आठवड्यात 1 कोटी चाचण्या करणारं 'किट' तयार; ICMRचाही होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 10:03 IST

पुणेस्थित मायलॅबने आठवड्यातून 1 लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले असून, एका किटनं 100 रुग्णांची तपासणी करता येणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

नवी दिल्लीः  कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. अनेक देशात या विषाणूनं हातपाय पसरले असून, संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रयोगशाळेत किटची कमतरता भासत होती. टेस्ट करण्यासाठीची किट परदेशातूनच आयात करावी लागत होती. हीच अडचण लक्षात घेता पुण्यातल्या कंपनीनं 6 आठवड्यात संशोधन करून 100 टक्के स्वदेशी बनावटीची किट तयार केली आहेत. पुणेस्थित मायलॅबने आठवड्यातून 1 लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले असून, एका किटनं 100 रुग्णांची तपासणी करता येणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे देशातल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे(ICMR)नंही याला मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ही किट बनवण्यात आली असून, त्याला देशातल्या FDA आणि  Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) या संस्थांनीही परवानगी दिली आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी दिली. अतिशय कमी किमतीत ही कीट तयार करण्यात आली असून, त्यासाठी फार कालावधीसुद्धा लागलेला नाही. पुण्यातल्या Mylab Discovery Solutions Pvt Ltd या कंपनीने ही किट तयार केलेली आहेत. Molecular Diagnostics क्षेत्रात या कंपनीचं काम असून, अशा विविध आजारांचं निदान करण्यासाठीच्या अनेक किट्स त्यांनी याआधी बनवल्या आहेत. सध्या कोरोनाची तपासणी करण्यासाठी भारत जर्मनीमधून ही किट्स मागवतो. मात्र जगभरात कोरोनाचा फैलाव झाल्यानं या किट्सला जगात प्रचंड मागणी आहे, त्यामुळे भारताला महागड्या किमतीत ही किट्स खरेदी करावी लागतात. तसेच त्याचा तुटवडा असल्यानं भरमसाट किंमतही मोजावी लागते. पण पुण्याच्या या कंपनीच्या दाव्यामुळे आता भारताची अडचण काही प्रमाणात कमी होणार आहेत.तसेच या किट्सचा दर्जाही अतिशय उच्च प्रतीचा असून, क्षमताही वाखाणण्याजोगी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. सध्या कोरोनाची लागण झाल्यानंतर सात तासांनंतरच तपासणीतून संबंधित व्यक्ती संक्रमित आहे की नाही हे समजते. या नव्या किटनुसार लागण झाल्याच्या फक्त अडीच तासांमध्येच कोरोना बाधिताचं निदान करता येणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या