शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: तिहार तुरुंगातील कुख्यात दहशतवाद्याने व्यक्त केली कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची इच्छा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 19:12 IST

Coronavirus in India: तिहार तुरुंगात बंद असलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या कुख्यात दहशतवाद्याने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. काही ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, औषधांची टंचाई निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी डॉक्टर आणि नर्सचाही तुटवडा आहे. अशा परिस्थितीत तिहार तुरुंगात बंद असलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या कुख्यात दहशतवाद्याने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रकरणी त्याने न्यायालयातही धाव घेतली आहे. 

न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये आरोपी सबील अहमद याने सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रातील माझ्या अनुभवाचा फायदा या तुरुंगातील कैद्यांवरील उपचार आणि कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचारांसाठी होऊ शकतो. अल कायदा इन द इंडियन सब-कॉन्टिनंटचा सदस्य राहिलेल्या अहमद याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने २२ फेब्रुवारी रोजी अटक केले होते. भारत आणि परदेशातील दहशतवादी संघटनांच्या सदस्यांना कथितपणे आर्थिक आणि अन्य मदत पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान, अहमदचे वकील एम. एस. खान यांनी आरोपीने व्यक्त केलेल्या इच्छेबाबत तुरुंग प्रशासनाला योग्य ते निर्देश देण्याची विनंती केली आहे.  आरोपी सबील अहमद हा एमबीबीएस डॉक्टर आहे. तसेच गंभीर रुग्णांवर उपचार करण्याचा त्याला सात वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाचा फायगा सर्वसामान्य आणि कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी करून घेता येऊ शकेल, असे त्याने म्हटले आहे. ३० जून २००७ मध्ये ब्रिटनमधील ग्लासगो येथील विमानतळावर झालेल्या फिदायिन हल्ल्याप्रकरणी सबील अहमद हा आरोपी आहे. त्याला २० ऑगस्ट २०२० रोजी सौदी अरेबियाने भारताकडे प्रत्यार्पित केले होते. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला ताब्यात घेतले होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतjailतुरुंगterroristदहशतवादीdocterडॉक्टर