शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

CoronaVirus: ‘त्या’ १८६ रुग्णांना संसर्ग कसा झाला?; आरोग्य यंत्रणेला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 07:05 IST

लक्षणे नसतानाही रिपोर्टस् पॉझिटिव्ह; बाहेरदेशातूनही कोणी आलेले नाही, हे विशेष

नवी दिल्ली : देशभरात अनेक लोकांना कोरोनाची लक्षणे नसतानाही त्यांचे रिपोर्टस् पॉझिटिव्ह येत आहेत; पण संक्रमणाची कारणे मात्र कळत आहेत. दिल्लीमध्ये अशा १८६ रुग्णांना मात्र संसर्ग कसा झाला, याचाच शोध अद्याप आरोग्य यंत्रणेला लागलेला नाही.दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. त्याच वेळी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे. दिल्लीत एकूण २ हजार १५६ रुग्ण असून, यातील १८६ रुग्णांमध्ये संक्रमणाचा शोध घेणे सुरू आहे. यांच्यापैकी कोणीही बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेला नाही किंवा संबंधितांच्या संपर्कातही आलेला नाही. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी कोरोना संशयिताच्या संपर्कातही हे लोक आलेले नाहीत. एवढेच नव्हे तर यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नसताना त्यांचे रिपोर्टस् मात्र पॉझिटिव्ह आलेले आहेत. अशा रुग्णांमुळे सरकारची चिंता मात्र वाढली आहे. कारण लक्षणे नसतानाही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असेल तर यात सामुदायिक संक्रमणाचा धोका आहे. दुसरीकडे आरोग्यसेवक आणि पोलिसांनाही कोरोनाने विळखा घातला आहे.ज्या दोन यंत्रणांच्या भरवशावर रुग्णांवर उपचार आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे, त्यांनाच संसर्ग होत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. अपुºया पीपीई कीटस्ची समस्या अद्याप दूर झालेली नाही. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील इतर कर्मचारी साऱ्यांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच चांदनी महल पोलीस स्टेशनसह दिल्लीतील इतर भागांमधील पंधराहून अधिक पोलिसांना संसर्ग झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणेलाही धोका निर्माण झाला आहे. तुघलकाबादमध्ये एका किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या ३५ लोकांना कोरोना झाला. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीतही जोखीम निर्माण झाली आहे. मॉडेल टाऊन सर्कलमध्ये रूपनगर भागात एका सरकारी धान्य दुकानात काम करणाºया वृद्धाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे इथे धान्य खरेदी करायला येणाºया लोकांना स्थानबद्ध करून थेट संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू झाला आहे. या दुकानातून दीड हजारांहून अधिक लोक धान्य खरेदी करतात.व्हिसाचे उल्लंघन करणारे ६१९ विदेशी नागरिक अटकेतव्हिसाच्या अटींचे उल्लंघन करून भारतात राहणाऱ्या एकूण ६१९ विदेशी नागरिकांना ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यानंतरच्या गेल्या महिनाभरात देशाच्या विविध राज्यांत अटक करण्यात आली आहे.यापैकी बहुतांश विदेशी नागरिक हे दिल्लीत निजामुद्दीन मरकज येथे झालेल्या तबलिगी जमातच्या इज्तेमासाठी आलेले आहेत. पर्यटक व्हिसावर भारतात येऊन धर्मप्रचाराचे काम केल्याच्या आरोपावरून त्यांना ‘फॉरेनर्स अ‍ॅक्ट’ अन्वये अटक करण्यात आली आहे.यापैकी बहुतांश लोक बांगलादेशचे असून, इतर इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कझागस्तान, किरगिझीस्तान व ताजिकीस्तान या देशांचे आहेत, अशी अटकेची ताजी कारवाई सोमवारी प्रयागराज शहरात करण्यात आली. तेथे १६ विदेशी नागरिकांना अटक केली गेली.या अटकांची राज्यनिहाय आकडेवारी अशी आहे: उत्तर प्रदेश ३४१, महाराष्ट्र १५७, बिहार ६६, कर्नाटक ३४ व झारखंड २१. अन्य काही राज्यांत फक्त गुन्हे नोंदले आहेत; पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यानुसार तेलंगणात ८८, तामिळनाडू ७२, तर मध्यप्रदेशात ६३ विदेशी नागरिकांविरुद्ध अशा प्रकारचे गुन्हे नोंदले गेले आहेत.इंदिरापुरममध्ये वृद्धेला संसर्गगाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये आणखी एका वृद्ध महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ४७ झाली आहे. खासगी प्रयोगशाळेत या महिलेचे नमुने तपासण्यात आले होते. अद्याप १२६ चाचण्यांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झालेले नाही.रुग्णालयातील कर्मचाºयांचे आंदोलननोएडातील सेक्टर-२४ मध्ये ईएसआय रुग्णालयाचे कर्मचारी परिसरातच आंदोलन करीत आहेत. त्यांना मार्च महिन्याचे वेतन मिळाले नाही, असा त्यांचा आरोप आहे. कोरोनामुळे उद््भवलेल्या परिस्थितीत कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी सरकारी रुग्णालयाचे वेतन झालेले नाही, त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या