शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

CoronaVirus: देशात नव्या रुग्णांची दोन महिन्यांतील सर्वाधिक संख्या; केरळसह महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 07:27 IST

देशात १ जुलै रोजी कोरोनाचे ४८,७८६ नवे रुग्ण आढळून आले होते.

नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाचे ४७ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोना संसर्गामुळे आणखी ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये ३२ हजार नवे रुग्ण सापडले असून, याबाबत ते राज्य देशात आघाडीवर आहे.

देशात १ जुलै रोजी कोरोनाचे ४८,७८६ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण सापडले. देशात कोरोना रुग्णांचा आकडा आता ३ कोटी २८ लाख ५७ हजार ९३७ इतका झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये केरळमध्ये ३२,८०३ नवे रुग्ण सापडले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मिझोराम, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये सर्वांत जास्त नवे रुग्ण आढळले. 

जगात २१ कोटी रुग्ण-

जगभरात २१ कोटी ९३ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी १९ कोटी ६१ लाख लोक बरे झाले. या संसर्गाने ४५ लाख ४६ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ कोटी ८६ लाख रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील १ लाख ४ हजार जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.

वैज्ञानिक तथ्यांच्या आधारावर बूस्टर डोसचा निर्णय- पॉल

कोरोनाला रोखण्यासाठी बूस्टर डोस द्यायचा की नाही यावर जगभर विचारमंथन सुरू आहे. जो काही निर्णय होईल तो वैज्ञानिक तथ्यांच्या आधारावर घेतला जाईल, असे नीती आयोगाचे सदस्य  व्ही. के. पॉल गुरुवारी म्हणाले.  जागतिक आरोग्य संघटनेने या बूस्टर डोसला मंजुरी दिलेली नाही. देशातही नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे या विषयाकडे लक्ष आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस