शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

३०० हून अधिक कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या प्रवीण कुमार यांची कोरोनामुळेच जीवनयात्रा संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 10:52 IST

Coronavirus : आतापर्यंत त्यांनी केले होते कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३०० पेक्षा अधिक रुग्णांवर अंत्यसंस्कार

ठळक मुद्देआतापर्यंत त्यांनी केले होते कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३०० पेक्षा अधिक रुग्णांवर अंत्यसंस्कारहरयाणात होतेय कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. सध्या कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येत काहीशा प्रमाणात घसरण होताना दिसत असली तरी मृतांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसत आहे. या महासाथीमध्ये अनेकांनी आपल्या कुटुंबीयांना गमावलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या एका अधिकाऱ्याचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचा दुर्देवी प्रकार हरयाणामध्ये घडला आहे. हरयाणामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना सन्मानानं अंत्यसंस्कार करणाऱ्या प्रवीण कुमार यांचा कोरोमुळे मृत्यू झाला. हरयाणातील हिसार येथे आतापर्यंत त्यांनी ३०० पेक्षा अधिक जणांवर अंत्यसंस्कार केले होते. सोमवारी रात्री ४३ वर्षीय प्रवीण कुमार यांचं कोरोनामुळेच निधन झालं.हिसार पालिकेद्वारे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. प्रवीण कुमार हे त्या टीमचे प्रमुख होते. प्रवीण कुमार यांना दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याची माहिती हिसार पालिकेच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. कोरोनाचं निदान झाल्यानंतर त्यांना तेथील एका खासगी रुग्णालयात जाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्यानं त्यांचं निधन झालं असल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली. प्रवीण कुमार हे पालिकेच्या सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्षही होते.  

हरयाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढहरयाणामध्ये सोमवारी कोरोनाच्या नव्या ७,४८८ रूग्णांची नोंद झाली. यादरम्यान ११४ जणांचा मृत्यू झाला. यानंतर हरयाणातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ७,०१,९१५ वर पोहोचली आहे. हरयाणामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ६,७९९ रुग्णांचा मृत्यू झाला. हरयाणामध्ये गेल्या १५ दिवसांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सध्या सरकारनं लॉकडाऊन २४ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHaryanaहरयाणाhospitalहॉस्पिटल