शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

CoronaVirus: कोरोनाशी लढणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट; 'या' राज्याचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 09:13 IST

Coronavirus वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं मनोधौर्य वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

चंदिगढ: देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना समाजात चांगली वागणूक मिळत नसल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर हरयाणा सरकारनं वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचं वेतन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हरयाणातल्या वैद्यकीय आणि या क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्याना दुप्पट पगार मिळेल. पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांना दुप्पट वेतन मिळत राहील. राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेतला गेला.मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल डॉक्टर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, वैद्यकीय विद्यापीठांचे कुलगुरू, मेदांता मेडीसिटीचे संचालक डॉ. नरेश त्रेहन, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करत असलेल्या डॉक्टर आणि नर्सेससोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करण्यात आल्याची माहिती दिली. सध्या कर्तव्य बजावत असताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. कित्येकदा डबल ड्युटी करावी लागते. त्यामुळे सरकारनं तत्काळ पॅकेज द्यावं, अशी विनंती एका महिला डॉक्टरनं व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू असताना मुख्यमंत्र्यांकडे केली. यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी आरोग्य मंत्री अनिल विज आणि विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून वैद्यकीय आणि या क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करत असल्याची घोषणा केली. याचा लाभ कोरोनाशी लढणारे डॉक्टर, नर्स, चतुर्थ श्रेणी कामगार, रुग्णवाहिका चालकांना मिळेल.याआधी ओदिशा सरकारनं वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला होता. स्वत:च्या प्राणांची बाजी लावून कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन आधीच देण्याचा निर्णय ओदिशा सरकारनं घेतला. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हा निर्णय जाहीर केला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या