शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: देशात कोरोनाचा आलेख सपाट होतोय? आकडेवारीतून आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 06:04 IST

आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर गुरुवारी ३३.६ टक्क्यांवर गेला असून, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. एवढेच नाही तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही ३.३ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकाडाऊनला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि अन्य अधिकृत सूत्रांच्या विश्लेषक माहितीनुसार भारतातील कोरोनाचा आलेख सपाट होत असल्याचे दिसते. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर, तर मृत्यू दर आणि रुग्णाचे प्रमाण दुप्पट होण्याचा अवधीही कमालीचा वाढल्याने या आकडेवारीने आशा पल्लवित झाल्या आहेत.उपरोक्त अधिकृत सूत्रांच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर गुरुवारी ३३.६ टक्क्यांवर गेला असून, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. एवढेच नाही तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही ३.३ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या दरावधीतही गेल्या तीन दिवसांत लक्षणीय वाढ (१२.२) झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसांत रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दरही ५.५ टक्क्यांवर घसरला आहे.भारतात आजघडीला प्रति दहा लाख लोकसंख्येमागे १,२१२ चाचण्या केल्या जात असल्याने रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाबाधित रुग्ण वाढण्याचा दर मात्र गेल्या ५० दिवसांत स्थिर आहे. १ एप्रिल रोजी प्रति दहा लाख लोकांमागे ४० चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता चाचणीचे प्रमाण ३० पटींनी वाढले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याचा दर १ एप्रिल रोजी ३.७ टक्के होता, तो ११ मे रोजी ४ टक्के आहे. आणखी एक धीर देणारी बाब म्हणजे संसर्ग गुणांक दरही १.२३ टक्क्यांवर आला आहे. कोणतीही लस नसताना मिळालेले हे मोठे यश होय. वास्तविकता हा दर १ टक्क्याच्या खाली आला पाहिजे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्रात चाचण्या अधिकरुग्ण आणि मृत्यूसंख्येनुसार भारतात या आठवड्यातील सर्वाधिक प्रभावित राज्य महाराष्टÑ असले तरी टक्केवारीच्या तुलनेत पाच दिवसांतील सर्वाधिक दर ओडिशा (१५ टक्के), बिहार (१०६ टक्के), तामिळनाडूत (९%) आहे.तामिळनाडूनंतर महाराष्टÑात मोठ्या संख्येने चाचण्या (२.१८ लाख) केल्या जात असल्याने रुग्ण वाढत आहेत. चाचण्या करण्यात बिहार आणि ओडिशा मात्र सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत