Coronavirus: ‘त्या’ लोकांची माहिती द्या अन् मिळवा १० हजार; सरकारकडून रोख रक्कमेचं बक्षिस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 04:01 PM2020-04-11T16:01:46+5:302020-04-11T16:06:47+5:30

कोरोना व्हायरसमुळे जगभरात दहशतीचं वातावरण असलं तरी काही लोक अद्यापही या व्हायरसला हलक्यात घेत आहेत.

Coronavirus: giving information about hidden jamaati the government will give a reward of 10 thousand pnm | Coronavirus: ‘त्या’ लोकांची माहिती द्या अन् मिळवा १० हजार; सरकारकडून रोख रक्कमेचं बक्षिस जाहीर

Coronavirus: ‘त्या’ लोकांची माहिती द्या अन् मिळवा १० हजार; सरकारकडून रोख रक्कमेचं बक्षिस जाहीर

Next
ठळक मुद्देदिल्लीत तबलीगी जमातीच्या लोकांनी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केले होतेया कार्यक्रमात परदेशी लोकांसह हजारो लोक उपस्थित होतेकार्यक्रम संपल्यानंतर देशातील विविध राज्यात तबलीगी जमातीचे लोक गेले

बुलंदशहर – जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असून १७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १ लाखांहून जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची दहशत इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की बहुतांश देशांनी लॉकडाऊन करत लोकांना घरात राहण्याचं आवाहन केले आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या ७ हजारांपर्यंत पोहचली आहे तर २३९ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात दहशतीचं वातावरण असलं तरी काही लोक अद्यापही या व्हायरसला हलक्यात घेत आहेत. दिल्लीच्या मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेले लोक देशातील विविध राज्यांमध्ये गेले आहेत. या लोकांना शोधण्यासाठी प्रशासन वारंवार प्रयत्न करत आहे. मात्र यातील अनेक लोक आजही प्रशासनापासून लपत आहेत. त्यामुळे अशा लोकांची सूचना देणाऱ्यांना सरकारकडून १० हजारांचे बक्षिस देण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात कोरोनाचा धोका वाढत चालला असून बुंलदशहर जिल्ह्यात शेकडो मरकजहून आलेले लोक असल्याची माहिती आहे. हे लोक दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र आता विविध ठिकाणी हे लोक लपून बसले आहेत. अशा लोकांसाठी एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी १५०० संशयित नंबरचा शोध घेणं त्यांना ट्रेस करणे सुरु आहे. या लोकांचा सीडीआर काढून मागील २ महिन्यांचे लोकेशन शोधले जाणार आहे.

या जिल्ह्यातील लोकांना आवाहन करण्यात आलं आहे की, तबलीगी जमातीच्या कार्यक्रमातून जे कोणी याठिकाणी आले आहेत अथवा कुठेही लपून बसले आहेत. त्यांची माहिती पोलीस कंट्रोल किंवा सरकारी नंबरवर फोन करुन द्यावी. जे कोणी माहिती देतील त्यांना १० हजार रुपये बक्षिस देण्यात येतील आणि त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल असं संतोष कुमार सिंह यांनी सांगितले आहे.

खुर्जा येथील रुग्णालयात कोरोनासाठी स्पेशल वॉर्ड बनवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अरविंद कुमार यांनी सांगितले की, बुलंदशहराच्या जहांगीराबाद परिसरात जमातीच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ९ पर्यंत पोहचली आहे. बुलंदशहरातून १२० जणांचे नमुने पाठवण्यात आले त्यातील ११८ लोक जमातीचे होते. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २९ मार्चला आढळून आला. हा सिकंदराबाद येथील वीर खेडा गावातील रहिवाशी होता असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.  

Web Title: Coronavirus: giving information about hidden jamaati the government will give a reward of 10 thousand pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.