शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहूल, आठवडाभरात तब्बल ३५ टक्के रुग्णवाढ झाल्याने चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 10:26 IST

Coronavirus: गेल्या आठवड्यात देशातील कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णसंख्येत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.  

नवी दिल्ली - गेल्या एक दोन महिन्यांपासून ओसरलेला कोरोना विषाणू भारतात पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, गेल्या आठवड्यात देशातील कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णसंख्येत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.  मात्र दिलासादायक बाब  म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा कमी आहे.

भारतात कोरोना रुग्णसंख्येची वाढ ही दिल्ली आणि त्याच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये लक्षणीय प्रमाणात दिसून आली आहे. गेल्या सात दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र देशातील उर्वरित भागात कोरोना नियंत्रणात आहे. मात्र या वाढत्या आकड्यांनी लोकांची चिंता वाढवली आहे.

भारतामध्ये रविवारी संपलेल्या आठवड्यामध्ये कोरोनाचे सुमारे ६ हजार ६१० रुग्ण सापडले. गेल्या आठवड्यातील  चार हजार ९०० रुग्णांच्या तुलनेत आकडा अधिक आहे. त्यापूर्वीच्या आठवड्यात सुमारे ७ हजार १० रुग्ण सापडले होते. मात्र यावेळच्या आकड्यांमध्ये केरळमधील रुग्णसंख्येचा समावेश नाही आहे. कारण केरळने या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येची आकडेवारी देणे बंद केले आहे. केरळमध्ये ४ ते १० एप्रिलदरम्यान कोरोनाचे दोन हजार १८५ रुग्ण सापडले होते.

दरम्यान, कोविड नेटवर्क प्रिवलेंस गेल्या १५ दिवसांमध्ये ५०० पटींनी वाढले आहे. म्हणजेच दिल्ली-एनसीआरमध्ये आपल्या जवळच्या सोशल नेटवर्कमध्ये कुणालाही कोरोना झाल्याची माहिती देणाऱ्या लोकांच्या संख्येत लोकांच्या संख्येत  गेल्या १५ दिवसांत ५०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने सांगितले की, सर्व्हेमध्ये दिल्ली एनसीआरमधील सर्व जिल्ह्यांतील ११ हजार ७४३ जणांकडून माहिती घेण्यात आली.

दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाच्या ५१७ रुग्णांची नोंद झाली. तसेच दिल्लीमध्ये आता कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही १५१८ झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार यादरम्यान २६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत कोरोनामुले कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य