शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

कोरोना संकटात मोठी मदत; इंग्लंडमधून भारतात पोहोचली 100 व्हेंटिलेटर, 95 ऑक्सिजन काँसंट्रेटरची पहिली खेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 15:17 IST

इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन म्हणाले, ‘‘या घातक व्हायरसपासून जीव वाचविण्यासाठी शेकडो ऑक्सिजन काँसंट्रेटर आणि व्हेंटिलेटरसह, आता महत्वाचे वैद्यकीय उपकरणे भारतात पोहोचण्याच्या मार्गावर.

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी इंग्लंडवरून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन काँसंट्रेटरची पहिली खेप भारतात पोहोचली आहे. हे साहित्य सोमवारी सायंकाळी रवाना करण्यात आले होते. इंग्लंड सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एफसीडीओ'कडून मिळालेल्या पुढच्या खेपेची व्यवस्था या आठवड्यादरम्यान करण्यात येत आहे. यात 9 एअरलाइन कंटेनर लोडचा समावेश असेल. (First shipment of corona medical supplies from England to india arrived today including 100 ventilators and 95 oxygen concentrators)

यात 495 ऑक्सीजन काँसंट्रेटर, 120 Non-invasive व्हेंटिलेटर आणि 20 मॅन्युअल व्हेंटिलेटर्सचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तत्काळ आवश्यक असलेल्या उपकरणांचा पुरवठा लवकरात लवकर करण्यावर लक्ष आहे. दीर्घकाळासाठी भारतातील गरजा आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सरकारी विभाग, दोन्ही देशांचे उच्चायोग आणि इंग्लंडमधील मूळ भारतीयांच्या समुहांत चर्चा सुरू आहे.

"शव जाळले जात आहेत अन् यांना रक्ताची 'खुशबू' येतेय; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला PM मोदीच जबाबदार"

गेल्या आठवड्याच्या अखेरीस एफसीडीओने घोषणा केली होती, की भारत सरकारसोबत चर्चा केल्यानंतर कोरोनाविरोधातील लढाईत भारताला मदत करण्यासाठी 600हून अधिक महत्वाचे वैद्यकीय उपकरणे भारतात पाठविले जातील.

बोरीस जॉन्सन म्हणाले, इंग्लंड मित्र आणि सहकाऱ्याप्रमाणे भारतासोबत -इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन म्हणाले, ‘‘या घातक व्हायरसपासून जीव वाचविण्यासाठी शेकडो ऑक्सिजन काँसंट्रेटर आणि व्हेंटिलेटरसह, आता महत्वाचे वैद्यकीय उपकरणे भारतात पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. तसेच या कठीन प्रसंगात इंग्लंड एक ‘‘मित्र आणि सहकाऱ्या’’च्या रुपात भारतासोबत उभा आहे." इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी, भारत एक अत्यंत महत्वाचा भागिदार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोमवारी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत चर्चा केली.

CoronaVirus: धोकेबाज ड्रॅगन! चीननं आधी पुढे केला मदतीचा हात, आता भारताचा मेडिकल सप्लाय रोखला

देशातील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट -देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधितांच्या (Corona patient) संख्येत आज घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून साडे तीन लाखांवर हे रुग्ण सापडू लागले होते. मात्र, आजच्या आकड्याच तब्बल 29,847 ची घसरण झाल्याने, हा दुसऱ्या लाटेत सापडलेल्या देशवासियांसाठी एक मोठा दिलासा आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये 3,52,991 नवे रुग्ण आढळले होते. तर कोरोनामुळे 2812 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांचा आकडा आजवरचा सर्वाधिक आकडा होता. तसेच आतापर्यंत 2,19,272 रुग्ण बरे झाले आहेत.

Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडIndiaभारतBoris Johnsonबोरिस जॉन्सनNarendra Modiनरेंद्र मोदी