Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 07:43 PM2021-04-26T19:43:16+5:302021-04-26T19:46:30+5:30

आता केंद्र सरकारने परदेशातील कंपन्यांकडून लशीची आयात करण्याचा निर्णय राज्य सरकारांवर सोडला आहे. सध्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया इंग्लंडमधील एस्ट्राजेनेची लस तयार करत आहे. तर भारत बायोटेक देशी लस कोव्हॅक्सीन तयार करत आहे. (Corona vaccine)

Corona vaccine: government will not import corona vaccine from foreign countries | Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय

Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की आयात करण्याऐवजी मोदी सरकार देशी लस निर्मात्यांकडून लस खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देईल. मोदी सरकारने फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांना, आपली लस विकण्यासाठी परवानगी घेण्यास सांगितले होते.मे महिन्यात देशात रोज साडेचार लाख कोरोना रुग्ण आढळण्याची शक्यता

नवी दिल्ली - कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. यातच, केंद्र सरकारने परदेशातून कोरोना लस आयात न करण्याचा आणि यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारांवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाची पुष्टी केली आहे. (Corona vaccine: government will not import corona vaccine from foreign countries)

अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की आयात करण्याऐवजी मोदी सरकार देशी लस निर्मात्यांकडून लस खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देईल. सरकारने याच महिन्यात खासगी लस निर्मात्यांना अॅडव्हॉन्सड पैसेही दिले आहेत. 

या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर, मोदी सरकारने फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांना, आपली लस विकण्यासाठी परवानगी घेण्यास सांगितले होते. एवढेच नाही, तर यासंदर्भात नियमही शिथील केले होते.

CoronaVirus: धोकेबाज ड्रॅगन! चीननं आधी पुढे केला मदतीचा हात, आता भारताचा मेडिकल सप्लाय रोखला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता केंद्र सरकारने परदेशातील कंपन्यांकडून लशीची आयात करण्याचा निर्णय राज्य सरकारांवर सोडला आहे. सध्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया इंग्लंडमधील एस्ट्राजेनेची लस तयार करत आहे. तर भारत बायोटेक देशी लस कोव्हॅक्सीन तयार करत आहे.

मे महिन्यात देशात रोज साडेचार लाख कोरोना रुग्ण आढळण्याची शक्यता -
भारतीय औद्योगिक संस्थेच्या (IIT) वैज्ञानिकांनी गणितीय मॉडेलच्या आधारे, भारतात कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या १४ ते १८ मे दरम्यान ३८-४८ लाखांपर्यंत पोहचू शकते. तसेच ४ ते ८ मे दरम्यान कोरोना संक्रमणाचे रुग्ण दिवसाला साडेचार लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. भारतात सोमवारी कोरोना संक्रमित ३ लाख ५२ हजार ९९१ रुग्ण आढळून आले आहेत. तर २ हजार ८१२ लोकांचा जीव गेला आहे. सध्या देशात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २८ लाख १३ हजार ६५८ पर्यंत पोहचली आहे. 

Corona Vaccine: कुणी घेऊ नये कोरोना लस Covishield आणि Covaxin? एका क्लिकवर जाणून घ्या, या लशींसंदर्भात सर्व काही

आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या वैज्ञानिकांनी सूत्र नावाच्या मॉडेलचा वापर करत मे महिन्याच्या पंधरवड्यात सक्रीय रुग्णांच्या संख्येत १० लाखांनी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. नव्या अंदाजानुसार या आकडेवारीत सुधारणा झाली आहे. मागील आठवड्यात ११ ते १५ मे दरम्यान कोरोना कहर वाढू शकतो असे सांगितले जात होते. मेच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्ण संख्येत घट होईल, असेही सांगण्यात आले आहे.
 

Web Title: Corona vaccine: government will not import corona vaccine from foreign countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.