शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

coronavirus: लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, मोदींचे आवाहन

By बाळकृष्ण परब | Published: October 20, 2020 6:35 PM

Narendra Modi : लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल असे आवाहन मोदींनी केले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजेकोरोनाविरोधातील लस अजून आलेली नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेलदेशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा लवकरच १० कोटींचा टप्पा पार करणार आहेत

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये लक्षणिय घट होत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणात बेफिकिरी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल असे आवाहन मोदींनी केले आहे.देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत कोरोनाविरोधातील लढाईत देशाने मोठा टप्पा पार केला आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली आहे. हळूहळू बाजारातील लगबग वाढत आहे. मात्र याच काळात देशात बेफिकीरी वाढत आहे. हल्लीच असे काही फोटो आणि व्हिडिओ दिसून आलेत. ज्यामध्ये लोक पुरेशी काळजी घेताना दिसत नाही आहेत. ही बाब योग्य नाही. काही बेजबाबदार लोक स्वत:ला आणि आपल्या कुटुंबालाही धोक्यात घालतात. आता सणावाराचे दिवस आहेत. मात्र थोडीशी बेफिकीरी जीवन उद्ध्वस्त करू शकते. तुम्ही तुमचे कुटुंबीय सुरक्षित, सुखी दिसावे, अशी माझी इच्छा आहे.  अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाच्या रुग्णांत घट झाल्यानंतर अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. 

लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. कोरोनाविरोधातील लस अजून आलेली नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, असे आवाहन मोदींनी केले आहे. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात देशात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली. मोदी म्हणाले की, कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ९० लाखांहून अधिक बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १२ हजार क्वारेंटाइन सेंटर उभारण्यात आली आहेत. देशात सध्या २० कोरोना चाचणी करणाऱ्या लॅब आहेत. तसेच देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा लवकरच १० कोटींचा टप्पा पार करणार आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत