शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कुटुंबीयांनी नाकारले, समाजाने ठोकरले, अखेर पतीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महिलेने घेतला धक्कादायक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 16:57 IST

Coronavirus News: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचा अवलंब केला जात आहे. मात्र कोरोनाच्या भयामुळे नाती, आपलेपणाही कमी होत चालला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाटणा - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचा अवलंब केला जात आहे. मात्र कोरोनाच्या भयामुळे नाती, आपलेपणाही कमी होत चालला आहे. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधील मुंगेर येथे घडली आहे. मृत पतीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक, समाज यांच्यापैकी कुणीच पुढे न आल्याने या महिलेने क्वारेंटाइन सेंटरमधून पळून जात पतीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. ( Family & community rejects, woman finally escapes from quarantine center and Funeral on husband)

रामनगर पाटन गावातील राहणाऱ्या २८ वर्षीय विकास मंडल यांचा आठवडाभरापूर्वी मृत्यू झाला होता. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर १३ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा त्यांच्या पत्नी कांचन देवी यांनी त्यांना बेगुसरायमधील रुग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असतानाच विकास मंडल यांचा मृत्यू झाला होता. 

त्यावेळी कांचन देवी ह्या रुग्णालयात एकट्याच होत्या. त्यांनी विकास मंडल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सासरच्या लोकांकडे मदत मागितली. मात्र मदतीसाठी कुणीही पुढे आले नाहीत. मात्र कांचनची आई मदतीसाठी धावून आली. त्या दोघींनीही मुंगेरला जाण्याचा निर्णय घेतला. तसेच १४ मे रोजी पुन्हा एकदा पतीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. मात्र त्यांनी पुन्हा एकदा येण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारले मात्र त्यांनीही नकार दिला. मग त्यांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र कुटुंबातील पुरुष मंडळींनी त्यांना मदत करण्याऐवजी त्यांची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली. समस्तीपूर येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही महिलांच्या समस्येकडे लक्ष न देता त्यांची रवानगी क्वारेंटाइन सेंटरमध्ये केली. 

कांचन आणि तिच्या आईने क्वारेंटाइन सेंटरच्या अधिकाऱ्यांकडे त्यांना सोडण्याची विनंती केली. अखेर पतीच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी कांचन आणि तिची आई क्वारेंटाइन सेंटरमधून पलायन करण्यात यशस्वी ठरल्या. १८ मे रोजी त्या बेगुसराय येथे पोहोचल्या. बेगुसरायचे एसडीओ संजीव कुमार चौधरी यांनी सांगितले की, पीडित महिलेने  रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांकडे तिच्या पतीचा मृतदेह देण्याची विनंती केली. त्यानंतर आम्ही त्वरित पुढाकार घेऊन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सुपुर्द केला. आम्ही रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यामधून मृतदेह सिमरिया घाटवरील स्मशानात नेण्यात आला. तिथे कांचनने पतीवर अंत्यसंस्कार केले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारIndiaभारत