शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या काळजीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 12:59 IST

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून दिली आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरणइटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा आतापर्यंत 6 भारतीयांना कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली : चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तर, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. यातच कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'होली मिलन' कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून दिली आहे. जगभरातील तज्ज्ञ सांगत आहेत की, कोरोना व्हायरस (COVID-19) टाळण्यासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, मोठ्या संख्येने लोक एकत्रित केले जाऊ नयेत. यासाठी यावर्षी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे.

 

दरम्यान, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या 21 पैकी 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. सर्व पर्यटकांना हरयाणातल्या छावलामधील आयटीबीपीच्या छावणीत ठेवण्यात आले आहे. 

कालपर्यंत देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या 6 होती. त्यात आता इटलीहून आलेल्या 15 पर्यटकांची भर पडल्याने हा आकडा 21 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 6 भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला. यामधील तीन जण केरळचे असून या सर्व रुग्णांवर उपचार पूर्ण झाले आहेत.  

दुसरीकडे, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीची उपाययोजना सुरू केल्या आहेत. 3 मार्च किंवा त्याआधी व्हिसा जारी करण्यात आलेल्या इटली, इरान, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना भारतात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजदूत, संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, ओसीआय कार्डधारक यांना मात्र यामधून वगळण्यात आले आहे. मात्र, त्यांना वैद्यकीय चाचण्यांनंतर भारतात प्रवेश दिला जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाNarendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटर