शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Coronavirus: ...म्हणून दुसऱ्या लाटेत दररोज सापडले तीन लाखांहून अधिक रुग्ण, तज्ज्ञांनी सांगितले धक्कादायक कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 15:15 IST

Coronavirus in India: गेल्या तीन महिन्यांपासून  देशात धुमाकूळ घातल असलेल्या दुसऱ्या लाटेमुळे देशात लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ही लाट सर्वोच्च पातळीवर असताना देशात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. काही वेळा ही रुग्णसंख्या चार लाखांपर्यंतही पोहोचली होती.

ठळक मुद्देभारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमागचं सर्वात मोठं कारण हे डेल्टा व्हेरिएंट (B.1.617) होताहा व्हेरिएंट आणि त्याचा सब-लिनिएज (B.1.617.2) मुळेच भारतात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झालीडेल्टा व्हेरिएंट हा त्याआधी मिळालेल्या अल्फा व्हेरिएंटपेक्षा ५० टक्के अधिक संसर्गजन्य आहे

नवी दिल्ली - देशात आलेली कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली असली तरी या दुसऱ्या लाटेने दिलेल्या जखमा अजूनही भळभळत्या आहे.  (Coronavirus in India) गेल्या तीन महिन्यांपासून  देशात धुमाकूळ घातल असलेल्या दुसऱ्या लाटेमुळे देशात लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ही लाट सर्वोच्च पातळीवर असताना देशात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. काही वेळा ही रुग्णसंख्या चार लाखांपर्यंतही पोहोचली होती. दरम्यान, भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट चारपट अधिक मोठी असण्याचे आणि दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण सापडण्यामागचे धक्कादायक कारण तज्ज्ञांनी सांगितले आहे. (Due to covid-19 delta variant more than three lacks patients found every day in the second wave of Coronavirus in India)

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमागचं सर्वात मोठं कारण हे डेल्टा व्हेरिएंट (B.1.617) होता. हा व्हेरिएंट आणि त्याचा सब-लिनिएज (B.1.617.2) मुळेच भारतात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. डेल्टा व्हेरिएंट हा त्याआधी मिळालेल्या अल्फा व्हेरिएंटपेक्षा ५० टक्के अधिक संसर्गजन्य आहे. 

ही माहिती नॅशन सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (एनसीडीसी) आणि आयएनएसएसीओजी च्या संशोधकांनी संशोधनामधून समोर आणली आहे. यूकेमध्ये सापडलेल्या अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट ५० टक्के अधिक वेगाने पसरतो. चाचणी घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंटची टक्केवारी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात २० टक्के आणि मार्च महिन्यात ४० टक्क्यांपर्यंत वाढली होती.  डेल्टा व्हेरिएंटचे सब-लिनिएज बी.१.६१७.२ मध्ये ई४८४क्यू म्युटेशन नव्हते. मात्र टी४७८के आला होता. नमुन्यांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून आले. जसजसा पॉझिटिव्हिटी रेट वाढला. तसतसे याचे प्रमाणही वाढत गेले. अल्फा व्हेरिएंटचा केस फॅटिलिटी रेश्यो डेल्टाच्या तुलनेत अधिक होता. मात्र संशोधन सांगते की, सध्यातरी सीएफआरमधील बदल बी.१.६१७.२ शी थेट संबंध असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. 

डेल्टा व्हेरिएंट सर्व राज्यामध्ये सापडला. मात्र याचा सर्वाधिक संसर्ग दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगाणा आणि ओदिशामध्ये दिसून आला. लसीकरणानंतर होणाऱ्या संसर्गामध्येही याची भूमिका होती. बी.१.६१७ या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण गतवर्षी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सापडला होता. त्याला डबल म्युटेशन व्हेरिएंट म्हटले गेले. आतापर्यंत हा व्हेरिएंट जगातील ६० हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. हा व्हेरिएंट अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक पसरतो. तसेच यावर होणाऱ्या लसीच्या परिणामाबाबतही डब्ल्यूएचओने अद्याप फार काही सांगितलेले नाही.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य