शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Coronavirus: डीआरडीओने विकसित केली Dipcovan अँटीबॉडी डिटेक्शन किट, असं करते काम, किंमत केवळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 20:10 IST

Coronavirus in India: डीआरडीओने कोविड-१९ अँटीबॉडी डिटेक्ट करण्यासाठी एक किट बनवली आहे. डीपकोविन असे या अँटीबॉडी डिटेक्ट करणाऱ्या किटचे नाव आहे

नवी दिल्ली - डीआरडीओने कोविड-१९ अँटीबॉडी डिटेक्ट करण्यासाठी एक किट बनवली आहे. डीपकोविन असे या अँटीबॉडी डिटेक्ट करणाऱ्या किटचे नाव असून, ही किट SARS-CoV-2 विषाणूच्या प्रोटिनला डिटेक्ट करू शकते. ही किट दिल्लीस्थित वेनगार्ड डायग्नोस्टिक प्रायवेट लिमिटेडसोबत मिळून विकसित केली आहे. या किटची चाचणी करण्यासाठी दिल्लीतील वेगवेगळ्या कोविड रुग्णालयामधून एक हजार रुग्णांच्या सँपलची चाचणी घेण्यात आली आहे. (DRDO Developed Dipcovan Antibody Detection Kit) गेल्या एका वर्षात या प्रॉडक्टच्या तीन वेगवेगळ्या बॅचची तपासणी करण्यात आली. तसेच याचवर्षी एप्रिल महिन्यामध्ये आयसीएमआरने या अँटीबॉडी डिटेक्शन किटला परवानगी दिली आहे. याच महिन्यामध्ये या प्रॉडक्टला हेल्थ मिनिस्ट्री ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)कडून परवानगी मिळाली आहे. ही किट बनवण्याची वाटण्याची आणि विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. डीसीजीआय रेग्युलेटरी अॅथॉरिटी आहे. 

 ह्युमन प्लाझ्मामध्ये कोविड-१९ च्या अँटीबॉडीचा या किटच्या माध्यमातून शोध घेता येऊ शकतो. या किटचे आयुर्मान दीड वर्ष एवढे आहे. ही किट विकसित करण्यामध्ये डीआरडीओची पार्टनर कंपनी असलेली वेनगार्ड डायग्नोस्टिक्स जून महिन्यामध्ये या किटचे अनावरण करणार आहे. तसेच अनावरणावेळी सुमारे १०० किट लाँच करण्यात येतील. या किटच्या माध्यमातून सुमारे १०० चाचण्या करता येणार आहेत.  

सध्या लाँच झाल्यानंतर सध्यातरी दरमहा ५०० किट बनवण्याची कंपनीची क्षमता आहे. तसेच या किटच्या माध्यमातून एका टेस्टची किंमत ७५ रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या किटमधून कुठल्याही व्यक्तीच्या शरीरात कोविड-१९ ची अँटीबॉडी आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. अनेकदा असिम्थमॅटिक रुग्णांना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे समजत नाही. मात्र आता या टेस्ट किटमधून अँटीबॉडीची माहिती मिळाल्यास त्यांना आधीच कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे निष्पन्न होईल.  ही टेस्टिंग किट ९७ टक्के उच्च संवेदनशीलता आणि ९९ टक्के विशिष्टतेसोबत विषाणूच्या म्युटेशनची माहिती मिळू शकते. त्याबरोबरच ही टेस्टिंग किट विषाणूच्या न्यूक्लियोकॅप्सिंड प्रोटिनचीसुद्धा माहिती मिळवू शकते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDRDOडीआरडीओIndiaभारत