शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा; देशात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग 3 दिवसांवरून 10 दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 20:06 IST

गेल्या 24 तासांत देशात कोरोना संक्रमित 419 रुग्ण बरे झाले आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही आहे.केंद्राबरोबरच अनेक राज्य सरकारांची चिंता वाढली आहे. पण कोरोना संक्रमणाच्या काळातही एक चांगली बातमी समोर आली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून, 3 दिवसांनी वाढून तो 10 दिवसांवर गेला आहे. 

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच अनेक राज्य सरकारांची चिंता वाढली आहे. पण कोरोना संक्रमणाच्या काळातही एक चांगली बातमी समोर आली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून, 3 दिवसांनी वाढून तो 10 दिवसांवर गेला आहे. तसेच गेल्या 24 तासांत देशात कोरोना संक्रमित 419 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच देशात एकूण 4,814 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचं ठीक होण्याचं प्रमाणही 20.57 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही वाढला असून, तीन दिवसांऐवजी आता 10 दिवसांनी देशात दुप्पट कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांद्वारे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.23 मार्चपूर्वी देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे दुप्पट होण्याचा कालावधी 3 दिवस, असा मोजला जात होता. त्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आले आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसला. 29 मार्चपासून दुपटीनं रुग्ण सापडण्याचा कालावधी वाढून पाच दिवसांवर गेला. त्यानंतर 6 एप्रिलपासून देशात कोरोना संसर्गाचा दुप्पट होण्याचा रुग्ण दर 10 दिवसांवर गेला आहे. देशात लॉकडाऊन लादले गेले नसते तर कोरोनाग्रस्तांची संख्या 73,400 हजारांवर जाण्याची भीतीसुद्धा वर्तवण्यात आली आहे.  गेल्या 24 तासांत देशात 1752 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर देशात एकूण रुग्णांची संख्या 23,452 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात 723 लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. गेल्या 28 दिवसांत देशातील आणखी 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचं कोणतंही प्रकरण समोर आलेलं नाही. आतापर्यंत देशात 80 जिल्हे असे आहेत, तिथे गेल्या 14 दिवसांत कोरोना संक्रमित एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही. 

आणखी हेसुद्धा वाचा

Coronavirus : आता बँकांना ६ महिन्यांपर्यंत करता येणार नाही संप, सरकारनं बनवला कायदा

Coronavirus : मोदी सरकार दुसरं मोठं पॅकेज देण्याच्या तयारीत; 48 तासांमध्ये होऊ शकते घोषणा

Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वामित्व योजनेची घोषणा, गावागावांना होणार जबरदस्त फायदा

CoronaVirus : "कर्मचारी अन् जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करायला हवा"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या