शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होममुळे वाढला कौटुंबिक हिंसाचार, अनेक राज्यातून आल्या तक्रारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 12:52 IST

लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे कौटुंबिक हिंसाचारामध्ये वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे24 मार्चपासून देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यामुळे देशातील बहुतांश लोक घरीच आहेत24 मार्चनंतर कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे वाढली आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीकाही विकृत मनोवृत्तीचे लोक भोजन आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंचे निमित्त काढून फिरत आहेत आणि मुलींसोबत गैरवर्तन आणि छेडछाड करत आहेत

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार 24 मार्चपासून देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यामुळे देशातील बहुतांश लोक घरीच आहेत. त्यातही अनेक आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा दिली आहे. मात्र लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे कौटुंबिक हिंसाचारामध्ये वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. 24 मार्चनंतर कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे वाढली आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्लीतील डीसीपी (अॉपरेशन्स अँड कम्युनिकेशन) एसके सिंह यांनी सांगितले की, "देशाच्या राजधानीत महिलांसोबत होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात येणाऱ्या फोन कॉलमध्ये वाढ होणे आमच्यासाठी धक्कादायक आहे. याआधी आम्हाला कौटुंबिक हिंसाचार आणि छेडछाडीसंदर्भातील फोन दरदिवशी सुमारे 900 ते 1000 या प्रमाणात येत असत. मात्र लॉकडाऊननंतर आम्हाला येणाऱ्या फोनकॉल्सची संख्या वाढून 1000 ते 1200 एवढी झाली आहे.

काही महिलांनी दिल्लीतील जेजे कॉलनीजवळून फोन केला आहे. त्यातून त्यांनी आपल्या शेजाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. काही विकृत मनोवृत्तीचे लोक भोजन आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंचे निमित्त काढून फिरत आहेत आणि मुलींसोबत गैरवर्तन आणि छेडछाड करत आहेत, अशा आशयाच्या तक्रारी येत आहेत.  मात्र लॉकडाऊनमुळे महिलांना घराबाहेर पडून तक्रार करणे शक्य होत नाही आहे, मात्र महिलांकडून येणाऱ्या फोनकॉल्सचे प्रमाण वाढले आहे

टॅग्स :Domestic Violenceघरगुती हिंसाcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीIndiaभारत