शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनामुळे मुलांच्या मेंदूवरही परिणाम होतो? तज्ज्ञांनी दिली अशी माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 22:03 IST

Coronavirus in India: कोरोना विषाणूमुळे मुलांच्या मेंदूवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे.

नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण देशात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूची सध्या दुसरी लाट सुरू आहे. तसेच पुढच्या काही काळात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार जर लोकांनी बेफिकीरी दाखवली आणि कोरोना नियमांचे पालन केले नाही, तर देशात कोरोनाची तिसरी लाट लवकरच येऊ शकते. यापूर्वी आयआयटीच्या तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका असल्याचे म्हटले होते. त्यामुळे पालकांमध्ये चितेचे वातावरण आहे, तसेच कोरोना विषाणूमुळे मुलांच्या मेंदूवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. (Does coronavirus affect children's brains? Information provided by experts)

कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटांमध्ये मुलांनाही मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. एवढेच नाही तर मुलांमध्ये पोस्ट कोविडच्या प्रभावामुळे अन्य आजारही दिसून येत आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मुलांमध्ये मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतात का? हा प्रश्न विचारला जात आहे. कोरोना विषाणू फुप्फुसांप्रमाणेच मेंदूवरही परिणाम करतो का? याबाबत विचारले असता दिल्लीतील एम्समधील पीडियाट्रिक्स इंटेसिव्ह यूनिटच्या पीडियाट्रिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. राकेश लोढा म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग मुलांमध्ये असिम्थमॅटिक किंवा सौम्य लक्षणांसह दिसून आला आहे. अगदी मोजक्या रुग्णांमध्ये गंभीर परिणाम दिसून आले आहेत. एवढेच नाही तर केवळ काही मोजच्या मुलांमध्येच कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून आली आहेत.डॉ. लोढा यांनी सांगितले की, गंभीर कोरोना लक्षणांमध्ये बाधित मुलांच्या फुप्फुसांवर संसर्गाचा परिणाम अधिक प्रमाणात दिसून आला आहे. यामध्ये मेंदूवरही संसर्गाचा परिणाम अधिक प्रमाणात दिसून आला आहे. यामध्ये मेंदूवरही संसर्गाचा परिणाम दिसू शकतो. त्याचा परिणाम मेंदूचे संतुलन बिघडण्यामध्ये होऊ शकतो. कोरोनाच्या संसर्गामुळे फुप्फुसांवर विपरित परिणाम होते. त्यामुळे मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बाधित होतो. त्यामुळे नुकसान होऊ शकते. एवढेच नाही तर कोरोना हा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे मुलांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. तसेच दीर्घकाळापासून घरी राहिल्याने तसेच लॉकडाऊनमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने मुलांच्या पोषणावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत आर्थिक आणि सामाजिक नुकसानही झाले आहे. अशा प्रकारे कोरोनामुळे पीडित असो वा नसो मुलांच्या मेंदूवर कोरोनामुळे परिणाम झालेला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य