शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

CoronaVirus: रुग्णांमध्ये प्रदीर्घ काळ लक्षणं दिसत नसल्यानं डॉक्टर चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 07:06 IST

संसर्गाचा धोका; एका रुग्णाच्या ४२ दिवसांत १९ चाचण्या ‘पॉझिटीव्ह’

तिरुअनंतपुरम : कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर सुमारे १४ दिवसांत रुग्णामध्ये ‘कोविड-१९’ आजाराची लक्षणे दिसू लागतात, असा सर्वसाधारण समज असल्याने तेवढ्या दिवसांच्या क्वारंटाईनचा नियम ठरविण्यात आला आहे. परंतु, लागण होऊन ४० दिवसांनंतरही लक्षणे दिसत नसूनही ‘पॉझिटीव्ह’ राहणारे रुग्ण आढळल्याने केरळमधील डॉक्टर चिंतेत पडले आहेत. अशा रुग्णांपासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका त्यांना सतावत आहे.ही अडचण लक्षात घेता, संसर्ग झाल्यावर लक्षणे दिसायला दुप्पट म्हणजे २८ दिवसांचा वेळही लागू शकतो, असे गृहीत धरून केरळमध्ये कोरोना रुग्णांचे व्यवस्थापन केले जात आहे. तरी त्याहूनही अधिक काळ ‘पॉझिटीव्ह’ राहूनही लक्षणे न दिसणारे रुग्ण कसे हाताळायचे, अशी नवी समस्या आता जाणवत आहे.मध्य केरळमधील पथनामथिट्टा या जिल्ह्यातील एक ६२ वर्षांची महिला याचे ठळक उदाहरण आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. शिजा यांनी सांगितले, की गेल्या ४२ दिवसांत या महिलेच्या लागोपाठ १८ वेळा चाचण्या घेण्यात आल्या व या सर्व चाचण्या ‘पॉझिटीव्ह’ आल्या आहेत. एवढे होऊनही तिला ‘कोविड-१९’ची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अनेक प्रकारची औषधे बदलून देऊन पाहिली तरी तिच्या शरीरातील कोरोना विषाणू अद्याप पूर्णपणे गेलेले नाहीत.ही महिला सध्या कुझ्झेनचेरी येथील सरकारी रुग्णालयात आहे. तिला अन्य काही आजार नाही. आता आणखी एक चाचणी ‘पॉझिटीव्ह’ आली, तर आम्ही तिला कोझिकोडे मेडिकल कॉलेज इस्पितळात पाठविण्याच्या विचारात आहोत. शिवाय आम्ही तिची केस राज्य मेडिकल बोर्डालाही कळविली आहे. पथनामथिट्या जिल्ह्यातच आणखी एका मुलीची केसही काहीशी अशीच आहे. रेल्वेने येताना तिच्या डब्यात दिल्लीच्या तब्लिगी जमातच्या कार्यक्रमाला जाऊन आलेले लोक होते. त्यांच्याकडून तिला संसर्ग झाला. तिला २८ दिवस निगराणीखाली ठेवले; पण कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. अगदी शेवटच्या दिवशी तिला घरी सोडण्याआधी घेतलेली चाचणी ‘पॉझिटीव्ह’ आली. यालाही आता १० दिवस उलटले तरी तिला अद्याप लक्षणे दिसत नाहीत. उत्तर केरळमधील कोझिकोडे येथेही असाच एक रुग्ण आढळला आहे. दुबईहून परत आलेल्या या इसमाला संसर्ग झाल्यानंतर तब्बल ३२ दिवसांनी त्याची चाचणी ‘पॉझिटीव्ह’ आली. (वृत्तसंस्था)चीनमध्ये बरे झालेले रुग्ण पुन्हा पॉझिटीव्हबीजिंग : कोरोना साथीला परिणामकारकपणे आळा घातल्याचे समजून दोन महिन्यांच्या ‘लॉकडाऊन’नंतर सार्वजनिक व्यवहार पुन्हा सुरु केल्या गेलेल्या चीनच्या वुहान प्रांतात पूर्ण बरे झाल्याने घरी पाठविलेल्या रुग्णांच्या ६०-७० दिवसांनंतर केलेल्या चाचण्या पुन्हा ‘पॉझिटीव्ह’ येत आहेत. डॉक्टरांना बुचकळ््यात टाकणारे असे किमान १२ रुण आढळल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.४या रुग्णांच्या एवढ्या दीर्घ काळानंतर केलेल्या चाचण्या ‘पॉझिटीव्ह’ येऊनही त्यांच्यात कोरोनाची कोणताही बाह्य लक्षणे दिसत नाहीत, ही आणखी चिंतेची बाब आहे. यामुळे संसर्ग झाला, की शरीरात त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती आपोआपच निर्माण होते व पुन्हा लागण होत नाही, हा समज यामुळे खोटा ठरत आहे. कोरोना विषाणूचा नव्याने दिसून आलेला हा गुणविशेष नक्कीच चिंता वाढविणारा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या