CoronaVirus : आपत्ती निवारणासारखेच होणार लस वाटपाचे काम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:44 AM2020-10-18T05:44:05+5:302020-10-18T05:45:59+5:30

देशातील कोरोनाची स्थिती, कोरोनाची लस वितरित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेली पूर्वतयारी आदी गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत घेतला. (Narendra Modi)

CoronaVirus: The distribution of vaccines will be like disaster relief Prime Minister Narendra Modi instructions | CoronaVirus : आपत्ती निवारणासारखेच होणार लस वाटपाचे काम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश

CoronaVirus : आपत्ती निवारणासारखेच होणार लस वाटपाचे काम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश

Next

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : निवडणुका घेण्यासाठी किंवा आपत्ती निवारणात ज्या प्रकारे यंत्रणा काम करतात, त्याच धर्तीवर देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यासाठी यंत्रणा राबविली जायला हवी. सर्व सरकारी, नागरी संस्थांना या मोहिमेत सामील करून घ्यावे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

देशातील कोरोनाची स्थिती, कोरोनाची लस वितरित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेली पूर्वतयारी आदी गोष्टींचा आढावा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत घेतला. ते म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे कोणीही बेसावध राहू नये. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी शथीर्चे प्रयत्न करण्याची गरज आहे.

मार्चआधी लस नाही - 
मार्च-एप्रिलच्या आधी कोरोना लस विकसित होणे कठीण आहे असेही पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत तज्ज्ञांनी सांगितले.

दोन लसींच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात
भारत बायोटेक, आयसीएमआरच्या संयुक्त प्रयत्नातून देशात बनणारी कोव्हॅक्सिन व झायडसकॅडिलाच्या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा तर सिरम-अ‍ॅस्ट्रोझेनिसा बनवत असलेल्या कोव्हिशिल्ड या लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सध्या सुरू असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.

रेमडेसिवीरच्या वापरावर बारीक लक्ष
रेमडेसिवीरमुळे कोरोना रुग्ण लवकर बरा होतो या गोष्टीत तथ्य नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच जाहीर केल्याने भारतातही रेमडेसिवीरच्या उपयोगाबाबत औषध नियंत्रक यंत्रणा आता बारीक लक्ष ठेवून आहे. रेमडेसिवीर अनेक देशांत अव्वाच्या सव्वा किमतीला विकले जात आहे.

Web Title: CoronaVirus: The distribution of vaccines will be like disaster relief Prime Minister Narendra Modi instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.