शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्यांना कोरोना लस देण्यासाठी उभारणार डिजिटल यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 06:46 IST

रशियात तयार झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने म्हटले आहे की, या लसीचे उत्पादन भारतासहित अनेक देशांत होईल.

नवी दिल्ली : रशियाने कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याचे जाहीर केल्यानंतर त्या देशाकडून ही लस विकत घेता येईल का तसेच त्या लसीचा साठा कशारीतीने करता येईल आदी गोष्टींचा विचार करण्यासाठी कोरोना लसीसंदर्भातील विशेष समितीची बुधवारी पहिली बैठक झाली. त्यात राज्यांना कोणाकडूनही थेट लस विकत घेण्याचा अधिकार नाही, हे स्पष्ट करण्यात आले. मात्र राज्यांना लस वितरित करण्यासाठी व पारदर्शक कारभाराकरिता डिजिटल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल होते तर आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषणही यावेळी उपस्थित होते. रशियात तयार झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने म्हटले आहे की, या लसीचे उत्पादन भारतासहित अनेक देशांत होईल. या लसीच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा भारत, सौदी अरेबिया, युएई, ब्राझिल, फिलिपिन्स आदी देशांमध्ये पार पडणार आहे.कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात नेमलेल्या विशेष समितीच्या बैठकीत असे ठरविण्यात आले की, प्रत्येक राज्याचे सरकार व संबंधित यंत्रणा यांच्याशी लसीचे उत्पादन व वितरण या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. तसेच राष्ट्रीय स्तरावर लसीकरण कोणत्या पद्धतीने केले जावे यासाठी एक रुपरेषाही आखण्याचा निर्णय या समितीने घेतला. कोरोना प्रतिबंधक लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यानंतर त्याचा साठा करण्यासाठी देशात पुरेशी शीतगृहे असणे आवश्यक आहे.ती यंत्रणा अधिक सक्षम करता येईल या विषयावरही समितीच्या बैठकीत चर्चा झाली. भारतामध्ये लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीचे भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन भविष्यात झाल्यास ती लस शेजारी देशांनाही निर्यात करणे शक्य होणार आहे. रशियाने कोरोना प्रतिबंधक लस तयार केली असली तरी तिच्या गुणवत्तेबद्दल जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका, जर्मनीसारख्या प्रगत देशांनी शंका व्यक्त केली आहे.लस सुरक्षित असणे अतिशय महत्त्वाचेएम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, रशियाने कोरोना प्रतिबंधक लस तयार केली असली तरी ती रुग्णांसाठी कितपत प्रभावी ठरते आहे हे बारकाईने तपासून पाहावे लागेल. या लसीमुळे रुग्णाच्या तब्येतीवर कोणताही दुष्परिणाम झाला नाही तरच तिची गुणवत्ता सिद्ध होईल. या लसीमुळे रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती किती वाढते हेही तपासले जायला हवे. जर सर्व निष्कर्ष समाधानकारक असतील तर रशियाने बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस भारतासाठीही खूप उपयोगी ठरू शकेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या