शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: डेल्टा की लेम्बडा, कोरोनाचा कुठला व्हेरिएंट अधिक घातक? तज्ज्ञांनी दिली अशी माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 19:22 IST

Coronavirus News: कोरोना विषाणूने गेल्या दीड वर्षांपासून देशभरात थैमान घातले आहे. त्यातच कोरोनाचे डेल्टा आणि लेम्बडा हे नवे व्हेरिएंट समोर आल्याने तज्ज्ञ चिंतीत आहेत.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूने गेल्या दीड वर्षांपासून देशभरात थैमान घातले आहे. त्यातच कोरोनाचे डेल्टा आणि लेम्बडा हे नवे व्हेरिएंट समोर आल्याने तज्ज्ञ चिंतीत आहेत. कोरोनाच्या या दोन्ही व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Coronavirus in India)तसेच कोरोनाच्या या या दोन्ही व्हेरिएंटपैकी कुठला व्हेरिएंट अधिक घातक आहे, याबाबत अंदाज घेतला जात आहे. (Delta or Lambda, which variant of Coronavirus is more deadly?)

आता याबाबत माहिती देताना इंस्टिट्युट ऑफ लिव्हर अँड बायलियरी सायन्सचे संचालक डॉ. एस.के. सरीन यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात नाही आहेत. मात्र ते आहेत. डेल्टासुद्धा चिंताजनक आहे. मात्र आम्ही यावेळी लेम्बडा व्हेरिएंटबाबत अधिक चिंतीत आहोत. आपल्या देशात सध्या हा व्हेरिएंट दिसून आलेला नाही. मात्र तो येऊ शकतो.

डॉ. एस.के. सरीन यांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट अद्याप संपुष्टात आलेली नाही. मात्र जर कोणी पर्यटक संपूर्ण देश फिरून एखाद्या हिल स्टेशनवर गेला आणि तो तिथे विषाणू सोबत घेऊन गेला तर गर्दीमुळे असा पर्यटक सुपर स्प्रेडर ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून हिल स्टेशनांवर लोकांची गर्दी दिसून येत आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम झाला आहे.  डॉ. एस.के. सरीन यांनी कांवड यात्रेबाबत सांगितले की, जोपर्यंत लोक आश्वासन देत नाहीत की ते चुकीचे वर्तन करणार नाही, तोपर्यंत अशा प्रकारची यात्रा ही धोकादायक ठरू शकते.

दरम्यान, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी सांगितले की, लेम्बडा व्हेरिएंटवर लक्ष देण्याची गजर आहे. त्यासाठी त्यावर अधिक संशोधन केले जात आहे. डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे लेम्बडा व्हेरिएंटने आमच्या देशात प्रवेश केलेला नाही. आमची देखरेख ठेवणारी आयएसएसीओजी ही प्रणाली खूप प्रभावी आहे. तसेच जर हा व्हेरिएंट देशात आला तर ती याचा शोध घेईल.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य