शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

Coronavirus: देशात सहा लाखांचा टप्पा पार; जूनमध्ये ४ लाख १४ हजार जणांना कोरोना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 1:04 AM

गुजरातमधील (३३ हजार २३२) रुग्णांतही सातत्याने वाढ होत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत तेथील मृत्युदरही अधिक आहे.

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत नवे १९ हजार १४८ रुग्ण आढळल्याने देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आकडा ६ लाखांवर गेला आहे. गेल्या पाच दिवसांतच देशात सुमारे १ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण १७ हजार ८३४ जण मरण पावले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात ६ लाख ४ हजार ४१ रुग्ण आढळून आले आहेत.

त्यांच्यापैकी ३ लाख ५९ हजार ८५९ रुग्ण बरे झाले आहेत आणि सध्या २ लाख २६ हजार ९४७ जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५९.५२ टक्के आहे. देशात या वेगाने रुग्णसंख्या वाढत राहिल्यास जगातील क्रमवारीत भारत लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. सध्या भारताचा क्रमांक चौथा असून, अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसºया व रशिया तिसºया स्थानी आहेत. रशियात आतापर्यंत ६ लाख ६१ हजार १६५ रुग्ण आहेत.

भारतात पहिल्या ११० दिवसांत मिळून १ लाख रुग्ण आढळले होते, तर नंतरच्या अवघ्या ४४ दिवसांत रुग्णसंख्या ६ लाखांवर पोहोचली. सर्वाधिक ४ लाख १४ हजार १0६ जणांना कोरोनाची बाधा जून महिन्यात झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत ४३४ जणांचा या संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १९८ महाराष्ट्रातील आहेत. एकूण १७ हजार ८३४ पैकी ८ हजार ५३ मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन राज्यांत आता कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत १ लाख ८० हजार २९८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, तमिळनाडूत रुग्णांची संख्या ९४ हजारांवर गेली आहे. आतापर्यंत दिल्ली दुसºया क्रमांकावर होती. पण दिल्लीतील रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ तुलनेने कमी असून, तिथे आता ८९ हजार ८०२ रुग्ण आहेत. गुजरातमधील (३३ हजार २३२) रुग्णांतही सातत्याने वाढ होत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत तेथील मृत्युदरही अधिक आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान या तीन राज्यांत १८ हजार ते ३२ हजार रुग्ण आहेत, तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व हरयाणा या राज्यांमध्ये १४ ते १८ हजार रुग्ण आहेत. सर्वात कमी म्हणजे ५२ रुग्ण मेघालयात आहेत.चाचण्यांचे प्रमाण वाढवलेदेशात कोरोना चाचण्याही वेगात सुरू असून, आतापर्यंत ९0 लाख ५६ हजारांहून अधिक जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत. बुधवारीच २ लाख २९ हजार ५८८ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती आयसीएमआरतर्फे गुरुवारी देण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या