शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा असाही परिणाम; तब्बल २६ कोटी भारतीयांची चिंता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 14:54 IST

CoronaVirus News: कोरोना, लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट; सरकारसह संपूर्ण देशाची चिंता वाढणार

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला. गेल्या ५० हून अधिक दिवस देश लॉकडाऊन आहे. या काळात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असून कोट्यवधी मजूर आणि कामगारांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाल्यानं अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे येत्या काळात देशातल्या २६ कोटी जनतेचा समावेश गरीब वर्गात होऊ शकते, अशी भीती संयुक्त राष्ट्र आणि ऑक्सफर्डच्या गरिबी आणि मानवी विकास उपक्रमातून (ओपीएचआय) व्यक्त करण्यात आली आहे. २००६ ते २०१६ या कालावधीत भारतातील २७.१ कोटी जनता गरिबीतून बाहेर आल्याची आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या गरिबी निर्देशाकातून समोर आली होती. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ओपीएचआयसोबत याबद्दलचा अभ्यास करण्यात आला होता. सर्वाधिक वेगानं गरिबी हटवणाऱ्या पहिल्या दहा देशांच्या यादीत भारताचा समावेश होता. यानंतर भारतामधील गरिबांची संख्या ३६.९ कोटी असल्याचं संयुक्त राष्ट्रानं सांगितलं होतं.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशव्यापी लॉकडाऊन लागू झाला. त्यामुळे उद्योगधंदे ठप्प झाल्यानं कोट्यवधी लोकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. यामध्ये हातावर पोट असलेल्या मजूर आणि कामगारांचं प्रमाण अतिशय मोठं आहे. या लॉकडाऊनमुळे भारतामधील २६ कोटी लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या दारिद्र्यरेषेच्या वर असलेले लोक लॉकडाऊनमुळे दारिद्र्यरेषेखाली जातील, असा अंदाज ओपीएचआयच्या संशोधकांनी वर्तवला आहे. राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णयजाणून घ्या, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 4.0मध्ये काय सुरू अन् काय बंद?मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या