शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: देशात कोरोना साथीचा मोठा फैलाव; एका दिवसात १८ हजारांहून जास्त रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:05 IST

देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झालेला नाही या आपल्या मतावर केंद्र सरकार अद्यापही ठाम आहे. १,७४,००० पेक्षा अधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. इतर राज्यांपैकी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत

नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे १८ हजार ६५३ रुग्ण आढळल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ झाली असून, आजाराला बळी पडलेल्यांची एकूण संख्या १७ हजार ४०० झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यात अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसऱ्या, तर रशिया तिसºया स्थानावर आहे. भारतामध्ये एकूण कोरोना रुग्णांपैकी २ लाख २० हजारांहून अधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, ३ लाख ४७ हजारांहून अधिक रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, आता ते ५९.४३ टक्के इतके झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली.

कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे सुमारे पावणेदोन लाख रुग्ण एकट्या महाराष्ट्रात असून, त्यानंतर तामिळनाडू (९० हजार १६७), दिल्ली (८७ हजार ३६०) व गुजरातचा (३२ हजार ५५७ रुग्ण) क्रमांक लागतो. रुग्णवाढीचा वेग पाहता, पुढील २४ तासांत देशातील एकूण रुग्णांचा आकडा ६ लाखांच्या वर गेलेला असेल. या साथीचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांनी आता काही ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, गेले पाच दिवस त्यांच्यात किमान १८ हजारांनी भर पडत आहे.सामूहिक संसर्ग झाल्याचा इन्कारदेशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झालेला नाही या आपल्या मतावर केंद्र सरकार अद्यापही ठाम आहे. १,७४,००० पेक्षा अधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. इतर राज्यांपैकी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आतापर्यंत ७८५० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. 90 हजारांहून अधिक रुग्ण तामिळनाडूमध्ये आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांत तामिळनाडूचा दुसरा क्रमांक लागतो. 87 हजारांहून जास्त कोरोनाचे रुग्ण दिल्लीमध्ये आहेत. 32 हजारांहून अधिक गुजरातमध्ये आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये २३ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र