शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

Coronavirus: कोरोनाचं माहीत नाही; पण जेवण न मिळल्यास आम्ही उपासमारीनं नक्कीच मरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 19:11 IST

दिल्ली-एनसीआरमध्येही कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढतच चाललं आहे. त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला असून, संक्रमितांची संख्याही ५६०हून अधिक झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं जनतेही चिंतेत असून, केंद्र आणि राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत. दिल्ली-एनसीआरमध्येही कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढतच चाललं आहे. त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचंही आवाहन केलं जातं आहे. सगळ्यांनाच घरात राहण्याच्या सूचना करण्यात आल्यानं हातावर पोट असणाऱ्या मजुरांना उपासमारीची चिंता सतावू लागली आहे. दिल्लील जवळपास १५०हून अधिक मजूर आणि त्यांचे कुटुंबीय भुकेनं व्याकूळ असून, त्यांच्याकडे पाहणारं कोणीच नाही.  दक्षिण दिल्लीतल्या छत्तरपूरस्थित फतेहपूर बेरीच्या चंदन होला भागात मजुरांची संख्या लक्षणीय आहे. घराबाहेर पडून हे मजूर हात जोडून उभे राहिलेले आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्या मजुरांना काहीही मिळालेलं नाही. ते दररोज मोलमजुरी करून पोटाची खळगी भरण्यापुरते पैसे कमावतात. त्या पैशातच कुटुंबाचाही उदरनिर्वाह केला जातो. संचारबंदी लागू केल्यानं जे काही पैसे उरलेले होते, त्यात दोन दिवस त्यांचं भागलं. परंतु आता घरात काहीही अन्न शिल्लक नाही. तसेच त्यांच्याजवळ आता पैसेसुद्धा नाहीत.  यांच्याकडे रेशन कार्डही नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले हे मजूर रोजंदारी करून पोट भरतात आणि उदरनिर्वाह करतात. दिल्लीत जनता कर्फ्यूनंतर लॉकडाऊन करण्यात आल्यानं ते स्वतःच्या गावीसुद्धा आता जाऊ शकत नाहीत. या मजुरांकडे जेवणासाठी सामान आणि पैसेसुद्धा नाहीत. एका मुलानं पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितलं की, ४ दिवसांपासून उपाशी आहे, मला खाण्यासाठी काहीही  मिळालेलं नाही. वडील बाजारात गेल्या पोलीसवाले त्यांना मारून परत पाठवतात. नोकरदारांचा पगार त्यांच्या खात्यात जमा होणार आहे, परंतु ज्यांचं हातावर पोट असलेल्यांनी काय करायचं, अशा प्रश्न आता विचारला जात आहे. ज्या मजुरांकडे रेशनिंग कार्ड आहे, त्यांना धान्य मिळेल. परंतु ज्यांच्याकडे रेशनकार्डच नाही, अशा मजुरांनी काय खायचं. यावर सरकारकडून ठोस अशी उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानिक नगरसेवक, आमदार आणि खासदारांकडून यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. दिल्लीतला आज ७वा दिवस असून, या मजुरांना कोणताही सरकारी कर्मचारी किंवा एनजीओ भेटायला गेलेले नाहीत. सर्वच लोक मीडियाला विनंती करून न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल