शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, आतापर्यंत १३ जणांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 12:50 IST

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयापर्यंत कोरोनाने धडक दिली असून, नायब राज्यपालांच्या कार्यालयातील १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमधून काहीशी सूट दिल्यानंतर दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना राज्यातील महत्त्वाच्या सरकारी कार्यालांमध्येही कोरोनाचा शिरकाव नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील काही जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह

नवी दिल्ली - लॉकडाऊनमधून काहीशी सूट दिल्यानंतर दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकीकडे दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना राज्यातील महत्त्वाच्या सरकारी कार्यालांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आता दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयापर्यंत कोरोनाने धडक दिली असून, नायब राज्यपालांच्या कार्यालयातील १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

जवळपास सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतर सरकारने देशातील व्यवहार हळूहळू अनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र निर्बंध शिथील होऊ लागल्यावर देशातील कोरोनाचे रुग्णही वाढू लागले आहेत. दिल्लीत तर कोरोनाच्या रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पुढे गेला आहे. त्यातच नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील काही जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.दरम्यान, २८ ते ३१ मे दरम्यान, दिल्लीमध्ये सलग चार दिवस हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले होते. मात्र १ जून रोजी या प्रमाणात किंचीतशी घट झाली. सोमवारी दिल्लीमध्ये कोरोनाचे ९९० नवे रुग्ण सापडले. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या वर पोहोचला आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत २० हजार ८३४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, ५२३ जणांचा मृत्यू झाल्या आहे.

दिल्लीतील आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या दिल्लीत कोरोनाचे ११ हजार ५६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पैकी २ हजार ७४८ रुग्ण हे कोविड रुग्णालयात दाखल आहेत. यामधील २१९ रुग्ण आयसीयूमध्ये तर ४२ जण व्हेंटिंलेटरवर आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली