शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटने वाढवली चिंता, तीन राज्यांत आढळले 25 रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 09:36 IST

CoronaVirus : महाराष्ट्रात 15 मेपासून आतापर्यंत 7500 नमुने घेण्यात आले आहेत, त्यात डेल्टा प्लसची सुमारे 21 प्रकरणे आढळली आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

नवी दिल्ली : एकीकडे देशात कोरोना व्हायरसची (Coronavirus In India) दुसरी लाट कमी होत असताना डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta+ Variant) चेही प्रकरण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी नऊ जळगाव, सात मुंबई व सिंधुदुर्ग, ठाणे व पालगड जिल्ह्यातील प्रत्येकी एक आहेत, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले. तसेच, महाराष्ट्र सरकारने जीनोम सिक्वेंसिंग करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. CSIR आणि IGIB च्या नमुन्याच्या नेतृत्वात सॅम्पलिंग केले जात आहे. 15 मेपासून आतापर्यंत 7500 नमुने घेण्यात आले आहेत, त्यात डेल्टा प्लसची सुमारे 21 प्रकरणे आढळली आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

दुसरीकडे, केरळच्या दोन जिल्ह्यांमध्ये पलक्कड आणि पथनमथिट्टा या दोन जिल्ह्यातून गोळा झालेल्या नमुन्यांमध्ये सॉर्स-सीओव्ही -2 डेल्टा प्लसची किमान तीन प्रकरणे सापडली आहेत. सोमवारी येथील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पथनमथिट्टामधील जिल्हाधिकारी डॉ. नरसिंहगुरी टी.एल. रेड्डी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कडापारा पंचायत येथील चार वर्षाच्या मुलाला कोरोना व्हायरच्या नवीन डेल्टा-प्लस व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे आढळले.

CSIR-IGIB मध्ये घेण्यात आलेल्या मुलाच्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेंसिंगद्वारे नवीन व्हेरिएंट समजून आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दोन्ही जिल्ह्यातील बाधित भागात कठोर उपाययोजना केल्या आहेत. गेल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल म्हणाले होते की, नव्याने सापडलेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटला अद्याप चिंताजनक व्हेरिएंट म्हणून वर्गीकृत केलेले नाही.

Delta+ Variant चे पहिले प्रकरण मध्य प्रदेशातभारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे पहिले प्रकरण मध्य प्रदेशात आढळले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका 65 वर्षीय महिलेमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची लक्षणे आढळली. ही महिला होम आयसोलेशनमध्येच कोरोनातून बरी झाली. तसेच, तिला कोरोना लसीचे दोन डोसही देण्यात आले होते. 23 मे रोजी तिचे नमुने घेण्यात आले होते आणि 16 जून रोजी नॅशनल सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) च्या अहवालात म्हटले आहे की, तिला डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे. हिंदी वृत्तपत्र हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, राज्यातील शिवपुरी जिल्ह्यात चार जण डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संक्रमित आढळले होते. वृत्तामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या चौघांनाही लस देण्यात आली होती आणि त्यांचा संसर्गामुळे मृत्यू झाला.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य