शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

CoronaVirus : देशात पहिल्यांदाच २४ तासांत सापडले ३८६ रुग्ण; महाराष्ट्र, केरळ नव्हे, 'हे' राज्य आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 20:16 IST

मरकजमध्ये सहभागी झालेले ११०३ लोक समोर आले असून, त्यातील ६५८ जणांची चाचणी घेण्यात आली आहे.

नवी दिल्लीः देशात गेल्या २४ तासांत ३८६ नवे रुग्ण सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढण्यासाठी निजामुद्दीन मरकजची घटना प्रमुख कारण ठरलं आहे. दिल्लीस्थित निजामुद्दीन भागात १ ते १५ मार्चपर्यंतच्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात अनेकांनी सहभाग घेतला होता. त्यातीलच काही संक्रमित रुग्ण सोमवारी आणि मंगळवारी समोर आले आहेत.तबलिगी जमातशी संबंधित १८०० लोकांना ९ रुग्णालयं आणि क्वारंटाइन केंद्रात पाठवण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी २४ तासांत ३८६ रुग्ण समोर आल्याचं सांगितलं आहे. यातील १३४ रुग्ण हे तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. देशात एकूण १६३७ संक्रमित रुग्ण असून, मृतांचा आकडा ३८पर्यंत पोहोचला आहे. मरकजमध्ये सहभागी झालेले ११०३ लोक समोर आले असून, त्यातील ६५८ जणांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यातील ११० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.दिल्लीत १८, तामिळनाडूत ११० नवीन रुग्णते म्हणाले की, एकट्या दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये १८ नवे रुग्ण सापडले असून, तामिळनाडूमध्ये ११० नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असून, त्याला रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी दिली आहे. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली असून, कोरोनाला कशा प्रकारे रोखता येईल, यासंदर्भातील उपायांची चाचपणी करण्यात आली आहे. प्रवासी मजुरांना संसर्गाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी स्वतंत्र ठेवणे आणि त्यांच्या मदतीचा फेरआढावा घेण्यात आला आहे. देशात १२६ प्रयोगशाळांत होणारी तपासणीभारतीय चिकित्सा विज्ञान परिषदे (आयसीएमआर)चे रमण आर. गंगाखेडकर म्हणाले, देशातील आयसीएमआरच्या प्रयोगशाळांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४५६२ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. गंगाखेडकर यांनी सांगितले की, आयसीएमआरच्या संयुक्‍त प्रयोगशाळांची संख्या बुधवार १२६ झाली आहे. आयसीएमआरद्वारे प्रमाणित खासगी रुग्णालयांची संख्या ४९वरून ५१ झाली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ४७९१५ नमुन्यांची चाचण्या घेण्यात आली आहे, ज्यापैकी ४५६२ चाचण्या मंगळवारी आयसीएमआर नेटवर्क लॅबमध्ये करण्यात आल्या.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या