शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

coronavirus: महाराष्ट्रासह या दहा राज्यात कोरोनाची स्थिती भयावह, आरोग्य मंत्रालयाने सादर केली चिंताजनक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 16:01 IST

coronavirus in India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील दहा राज्यांमध्ये कोरनाची स्थिती भयावह असून, एका दिवसांत सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रासह या दहा राज्यांमध्ये आहेत.

ठळक मुद्देदेशामध्ये एका दिवसात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १० राज्यांमध्ये भारतामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढून २८ लाख ८२ हजार २०४ एवढी झाली आहेदेशात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांपैकी १६.४३ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ८२.५४ टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा देशाली आरोग्य व्यवस्थेला जोरदार दणका बसला आहे. (coronavirus in India) बेसुमार वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे कठीण बनले आहे. या परिस्थिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता वाढवणारी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार देशातील दहा राज्यांमध्ये कोरनाची स्थिती भयावह असून, एका दिवसांत सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रासह या दहा राज्यांमध्ये आहेत. दरम्यान, काल सापडलेल्या ३ लाख २३ हजार १४४ रुग्णांबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ एवढी झाली आहे. (Corona's condition is dire in ten states including Maharashtra, alarming figures released by health ministry) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशामध्ये एका दिवसात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १० राज्यांमध्ये सापडले आहेत. या राज्यांमध्ये कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत २८ कोटींहून अधिक सँपलची तपासणी झाली आहे. तसेच देशातील संसर्गाचा दर हा ६.२८ टक्के एवढा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ४८ हजार ७०० रुग्ण सापडले आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये ३३ हजार ५५१ आणि कर्नाटकमध्ये २९ हजार ७४४ रुग्णांचे निदान झाले आहे. 

 मंत्रालयाने सांगितले की, भारतामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढून २८ लाख ८२ हजार २०४ एवढी झाली आहे. तर एकूण बाधिकांची संख्या ही १६.३४ टक्के आहे. गेल्या २४ तासांमध्ये आजारी रुग्णांच्या संख्येमध्ये ६८ हजार ५४६ ने वाढ झाली आहे. देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान तामिळनाडू, गुजरात आणि केरळमध्ये आहेत. देशात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांपैकी १६.४३ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ८२.५४ टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 

देशातील दैनंदिन संसर्गाचा दर सध्यातरी २०.०२ टक्के एवढा आहे. मंत्रालयाने एकूण राष्ट्रीय मृत्यूदरात घट झाल्याचे सांगितले. सध्या हा दर १.१२ टक्के आहे. देशात गेल्या २४ तासांत एकू २ हजार ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ५२४ आणि दिल्लीमध्यी ३८० मृतांचा समावेश आहे. 

दरम्यान, कालच्या दिवसभरात देशात २ लाख ५१ हजार ८८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही १ कोटी, ५६ लाख २०९ वर पोहोचली आहे. दरम्यान आतापर्यंत देशभरात एकूण १४.५ कोटी लोकांना  कोरोनाविरोधातील लस देण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस