शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Coronavirus : देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५२७ वर; ४१ विदेशी नागरिकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 1:31 AM

coronavirus : कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी ३७ जण उपचारांनंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५२७ वर पोहोचली असून त्यामध्ये ४१ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.कोरोनामुळे देशात बळी गेलेल्यांची संख्या आता १० झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमधील मृतांचा समावेश आहे.कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी ३७ जण उपचारांनंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली आहे.देशभरात या विषाणूच्या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सारे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि रेल्वे, हवाई तसेच रस्त्यावरील वाहतूक सध्या पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे.केरळमध्ये देशातील कोरोनाचे ९५ रुग्ण असून, त्यापाठोपाठ महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या १०७ झाली आहे. कर्नाटकमध्ये ३७, राजस्थानमध्ये ३३, उत्तर प्रदेशमध्ये ३३, तेलंगणामध्ये ३२, दिल्लीत ३१, गुजरातमध्ये २९, हरयाणात २९, पंजाबमध्ये २१ रुग्ण आढळले आहेत.लडाखमध्ये कोरोनाचे १३, तामिळनाडूत १२, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी ७, छत्तीसगढमध्ये ६, जम्मू-काश्मीरमध्ये ४, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी ३, बिहार, ओडिशामध्ये प्रत्येकी दोन, पुडुचेरी, छत्तीसगढमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.अतिउत्साहींमुळे धोकादेशात अनेक ठिकाणी संचारबंदी असतानाही अतिउत्साही लोक रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांतून फिरताना आढळून येत आहेत. कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नका, असे सरकारने वारंवार आवाहन करूनही लोक ती गोष्ट गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू, भाजीपाला यांच्या खरेदीसाठी लोक दुकाने, मंडयांमध्ये तोबा गर्दी करताना दिसत आहेत.यामुळे कोरोनाच्या फैलावाचा धोका आणखी वाढणार असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. म्हणूनच केंद्र व राज्य सरकार लोकांना घरात राहण्याचे आवाहन करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत