शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने मंत्र्यांसह शेकडो जणांना वाटला प्रसाद, आतापर्यंत ३० जणांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 09:26 IST

Coronavirus in India: दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी कोरोनाबाबतच्या नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे.

चंदिगड - दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी कोरोनाबाबतच्या नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. (Coronavirus in India) असाच प्रकार पंजाबमधील संगरूर येथे घडला आहे. येथील गुरुद्वारामध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने शेकडो जणांना प्रसादाचे वाटप केले. यामध्ये दोन बड्या व्यक्तींचाही समावेश आहे. पंजाबचे शिक्षण मंत्री विजय सिंगला आणि संगरूरचे माजी आमदार प्रकाशचंद गर्ग हे यावेळी गुरुद्वारात उपस्थित होते. तसेच त्यांनीसुद्धा गुरुद्वारातील ग्रंथी असलेल्या या कोरोनाबाधित व्यक्तीकडून प्रसाद स्वीकारला. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित व्यक्तीकडून प्रसाद घेणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावात कोविड टेस्टिंग कॅम्पचे आयोजन करण्यास सांगण्यात आल्याची माहिती दिली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुद्वारातील ग्रंथींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी चाचणीसाठी ३१ मे रोजी दिलेले सॅम्पल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतरही त्यांनी गुरुद्वारात प्रसाद वाटला होता. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीने जेव्हा गुरुद्वारामध्ये प्रसाद वाटप केले तेव्हा तिथे खूप लोक उपस्थित होते. दिल्लीत आंदोलन करत असलेले शेतकरी करमजित सिंग यांच्या निधनानंतर ते इथे हजर राहिले होते. ग्रंथींनी १ जून रोजी गुरुद्वारामध्ये प्रसाद वाटला होता. दरम्यान, त्यांची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आली होती.  या घटनेनंतर गावामध्ये ३० जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गुरुद्वारामध्ये त्या दिवशी किती लोक उपस्थित होते याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. पंजाबमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे ग्रामीण भागांत सापडत आहेत. तसेच येथील मृत्यूदर शहरी भागांमध्ये सुमारे तीन पट अधिक आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPunjabपंजाबIndiaभारत