शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

coronavirus: चिंताजनक! देशातील ३४ जिल्ह्यांत १० दिवसांत दुपटीने वाढला कोरोना रुग्णवाढीचा वेग, महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश

By बाळकृष्ण परब | Updated: March 5, 2021 10:18 IST

coronavirus in India : देशभरातील १८० जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. चिंतेची बाब म्हणजे ३४ जिल्ह्यांमध्ये गेल्या दिवसांत रुग्णवाढ ही दुपटीने वाढली आहे.

ठळक मुद्देफेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून देशात पुन्हा एकदा वाढू लागला कोरोनाचा फैलावदेशभरातील १८० जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहेचिंतेची बाब म्हणजे ३४ जिल्ह्यांमध्ये गेल्या दिवसांत रुग्णवाढ ही दुपटीने वाढली आहे

नवी दिल्ली - सप्टेंबरपर्यंत कोरोनाचा कहर अनुभवल्यानंतर भारतातील कोरोनाचा संसर्ग (coronavirus in India) उतरणीला लागला होता. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. देशभरातील १८० जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. चिंतेची बाब म्हणजे ३४ जिल्ह्यांमध्ये गेल्या दिवसांत रुग्णवाढ ही दुपटीने वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक सहा जिल्हे महाराष्ट्रातील (coronavirus in Maharashtra) आहेत. तर पंजाबमधील ५, केरळ आणि गुजरातमधील प्रत्येकी ४ आणि मध्य प्रदेशमधील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. (Corona outbreak doubled in 10 days in 34 districts, including six districts in Maharashtra)

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १६ हजार ८३८ नवे रुग्ण सापडले आहेत. यादरम्यान, १३ हजार ८१९  जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ११३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे १ कोटी ११ लाख ७३ हजार नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १ कोटी ८ लाख ३८ हजाक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एक लाख ५७ हजार ५८४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १ लाख ७३ हजार ३६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असताना लसीकरणाचाही वेग वाढवण्यात आला आहे. गुरुवारपर्यंत देशभरात १ कोटी ७७ लाख ११ हजारहून अधिक जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यामध्ये १० लाख ९३ हजार ९५४ जणांना गुरुवारी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत ६८ लाख ३८ हजार ७७ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. तर ३० लाख ९३ हजार ९५४ जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे.  जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ११ कोटी ५९ लाख एवढी झाली आहे. आतापर्यंत ९ कोटी १७ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर तब्बल २५ लाख ७५ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाची सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. येथे दररोज सुमारे ७० ते ८० हजार करोना रुग्ण सापडत आङेत. तर अमेरिकेमधील कोरोना रुग्णवाढ काहीशी कमी झाली आहे. येथे सध्या ६० ते ८० हजार कोरोना रुग्ण दररोज सापडत आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत ही संख्या एक लाखांपेक्षा अधिक होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र