शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनानं भारतात ५६० लोक संक्रमित, ११ जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 09:20 IST

महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या १०७वर गेली असून, केरळमध्ये कोरोनानं बाधित झालेले १०५ रुग्ण समोर आले आहेत.

नवी दिल्लीः कोरोना विषाणूनं भारतात थैमान घातलं असून, बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५६०वर गेली असून, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४६ जणांची या जीवघेण्या रोगातून सुखरूप मुक्तता झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या १०७वर गेली असून, केरळमध्ये कोरोनानं बाधित झालेले १०५ रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाग्रस्तांमध्ये ४१ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.कोरोनामुळे देशात बळी गेलेल्यांची संख्या आता ११ झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमधील मृतांचा समावेश आहे. देशभरात या विषाणूच्या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सारे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि रेल्वे, हवाई तसेच रस्त्यावरील वाहतूक सध्या पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे.कर्नाटकमध्ये ३७, राजस्थानमध्ये ३३, उत्तर प्रदेशमध्ये ३३, तेलंगणामध्ये ३२, दिल्लीत ३१, गुजरातमध्ये २९, हरयाणात २९, पंजाबमध्ये २१ रुग्ण आढळले आहेत.लडाखमध्ये कोरोनाचे १३, तामिळनाडूत १२, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी ७, छत्तीसगढमध्ये ६, जम्मू-काश्मीरमध्ये ४, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी ३, बिहार, ओडिशामध्ये प्रत्येकी दोन, पुडुचेरी, छत्तीसगढमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. देशात अनेक ठिकाणी संचारबंदी असतानाही अतिउत्साही लोक रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांतून फिरताना आढळून येत आहेत. कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नका, असे सरकारने वारंवार आवाहन करूनही लोक ती गोष्ट गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू, भाजीपाला यांच्या खरेदीसाठी लोक दुकाने, मंडयांमध्ये तोबा गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे कोरोनाच्या फैलावाचा धोका आणखी वाढणार असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. म्हणूनच केंद्र व राज्य सरकार लोकांना घरात राहण्याचे आवाहन करीत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस