शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Coronavirus: चिंताजनक! भारतातील कोरोना मृतांचा आकडा तीन लाखांवर, अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:40 IST

Coronavirus in India: देशात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता ३,००,३१२ झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाने ६ लाखांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाने ४.४८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : अमेरिका आणि ब्राझीलनंतर आता भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या तीन लाखांवर गेली आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक बळी दुसऱ्या लाटेत गेले आहेत. गत दोन महिन्यांत ही संख्या वाढली आहे.देशात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता ३,००,३१२ झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाने ६ लाखांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाने ४.४८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ मेक्सिकोत २.२१ लाख, इंग्लंड १.२७ लाख, इटली १.२५ लाख, रशिया १.१८ लाख आणि फ्रान्समध्ये १.०८ लाख लोकांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे.अन्य देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर कमी आहे. इटली २.९९ टक्के, इंग्लंड २.८७ टक्के, ब्राझील २.७९ टक्के, जर्मनी २.३९ टक्के, रशिया २.३५ टक्के, स्पेन २.१९ टक्के, फ्रान्स १.८५ टक्के, अमेरिका १.७८ टक्के, भारत १.१२ टक्के आणि तुर्कीचा मृत्यूदर ०.८८ टक्के आहे. सध्या देशात दर १०० रुग्णांमागे एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक बळी दुसऱ्या लाटेत गेले आहेत. 

सातव्या दिवशीही रुग्णसंख्या ३ लाखांच्या आतनवी दिल्ली : देशात रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या दोन लाख ४० हजार ८४२ रुग्णांची नोंद झाली तर ३,७४१ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार रविवारी सलग सातव्या दिवशी रुग्ण तीन लाखांच्या खाली आले आहेत. देशात एकूण मृतांची संख्या २,९९,२६६ तर एकूण रुग्णांची संख्या २,६५,३०,१३२ झाली आहे. सध्या देशात २८ लाख ५ हजार ३९९ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण बाधितांच्या संख्येत ही टक्केवारी १०.५७ तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३० टक्के आहे. दोन कोटी ३४ लाख २५ हजार ४६७ जण बरे झाले असून मृत्यूदर १.१३ टक्के आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार २२ मेपर्यंत ३२ कोटी ८६ लाख ७ हजार ९३७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात शनिवारी तपासलेल्या २१ लाख २३ हजार ७८२ नमुन्यांचाही समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत