शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनामुळे पारशी समुदायाने बदलली अंत्यसंस्काराची हजारो वर्षे जुनी पद्धत, घेतला मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 18:16 IST

coronavirus In India : पारशी समाजाने समाजातील मृत कोरोनाबाधित व्यक्तिंवर होणाऱ्या अंत्यसंस्काराची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पारशी पंचायतीने या बदलांना मान्यता दिली आहे.

मुंबई - गेल्या दीड वर्षापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने केवळ आर्थिक, राजकीय आणि सामाजिक नाही तर विविध धर्मियांच्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या प्रथा परंपरा बदलण्याची वेळ आणली आहे. (coronavirus In India) कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पारशी समजाने आपल्या धर्मातील हजारो वर्षांपासून चालत आलेली एक परंपरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पारशी समाजाने समाजातील मृत कोरोनाबाधित व्यक्तिंवर होणाऱ्या अंत्यसंस्काराची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पारशी पंचायतीने या बदलांना मान्यता दिली आहे. (Corona changes Parsi community's old method of cremation)

पारशी समाजामध्ये मृत व्यक्तीचे शरीर पक्ष्यांना खाद्य म्हणून देण्याची प्रथा हजारो वर्षांपासून चालत आली होती. मात्र आता नव्या बदलानुसार पारशी समाजातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मृत व्यक्तीचे शरीर हे पक्षांना खाद्य म्हणून न ठेवता त्या शरीराचे दहन करण्यात येणार आहे. पारशी समाजामध्ये मृतदेह दहन वा दफन करण्याची पद्धत नव्हती. तर हा मृतदेह गिधाडासारख्या पक्षांना खाद्य म्हणून मोकळ्या जागेत ठेवण्यात येत असे. मृत्यूनंतर आपल्या शरीराचा कुणालातरी उपयोग व्हावा हा या परंपरेमागचा हेतू होता.  मात्र आता पारशी पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहांना मोकळ्या जागी न सोडता त्यांचे दहन करण्याचा निर्णय घेतला आहे. पारशी पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पारशी महिला किंवा पुरुषांच्या मृतदेहांना आता टॉवर ऑफ सायलेन्स किंवा खोल खड्ड्यात मोकळे सोडण्याऐवजी त्यांचे दहन केले जाईल.  

पारशी पंचायतीच्या एका सदस्याने सांगितले की, देशामध्ये पारशी समुदायाच्या लोकांची संख्या सुमारे १ लाख एवढी आहे. सध्या कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. त्यात कोरोनाच्या नियमावलीचेही पालन करायचे आहे. त्यामुळेच पारशी समाजाने हा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत