शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

CoronaVirus: “मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 2:02 PM

CoronaVirus: केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलकेंद्राने काम योग्य पद्धतीने केले नाही - राहुल गांधीकेंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (coronavirus congress rahul gandhi slams modi govt over receiving foreign help)

गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारची धोरणे, देशातील कोरोना परिस्थिती, कोरोना लसीकरण यांवरून निशाणा साधत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात लॉकडाऊन करण्याची मागणी यापूर्वी राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परदेशातून आलेल्या विविध मदतीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. यातच आता राहुल गांधी यांनी केंद्रावर योग्य पद्धतीने काम करत नसल्याचा आरोप केला आहे. 

सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागतेय, मग मोदी सरकार काय करतंय?”

ही बाब निराशाजनक

परदेशातून मिळणाऱ्या मदतीवरून केंद्र सरकारने सतत स्वतःची छाती बडवणे हे निराशाजनक आहे. जर मोदी सरकारने आपले काम केले असते तर ही परिस्थिती आली नसती, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केली आहे. 

देशाला PM आवास नको, श्वास पाहिजे

देशाला PM आवास नको, श्वास पाहिजे, असे ट्विट राहुल गांधींनी केले होते. ट्विटमध्ये त्यांची तुलना करणारे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे सुरू असलेले काम आणि दुसऱ्या बाजूला कोरोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत.

कोरोना नियंत्रणासाठी चीनने केलं, तेच आता भारतानेही करावं; डॉ. अँथनी फाउची

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात ३ लाख ६६ हजार १६१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३ हजार ७५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत १७ कोटी ०१ लाख ७६ हजार ६०३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकार