शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मायदेशाच्या मदतीला धावले दोन बड्या कंपन्यांचे सीईओ; पिचाई, सत्या नाडेला यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 06:41 IST

नवी दिल्ली : देशभरामध्ये कोरोनाचे संकट वाढत असताना विविध ठिकाणांहून मदत येत आहे. त्यातच जगातील दोन मोठ्या कंपन्यांच्या सीईओंनी ...

नवी दिल्ली : देशभरामध्ये कोरोनाचे संकट वाढत असताना विविध ठिकाणांहून मदत येत आहे. त्यातच जगातील दोन मोठ्या कंपन्यांच्या सीईओंनी या संकटकाळात आपल्या मायदेशाला मदत करण्यासाठी बाह्या सरसावल्या आहेत. गुगलचे सीईओ असलेले सुंदर पिचाई यांनी १३५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनीही भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ऑक्सिजन उपकरणे खरेदीसाठी कंपनी भारताला मदत देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रकोप झाला असून त्यामुळे देशभर रुग्णांची मोठी संख्या आहे. देशातील वैद्यकीय क्षेत्राकडे असलेली साधनसामग्री अपुरी पडत असून ऑक्सिजनचीही टंचाई जाणवत आहे. जगातील अनेक देशांनी भारताला मदत दिली आहे. देशातील गंभीर स्थितीची जाणीव होताच भारतीय असलेले दोन प्रमुख कंपन्यांचे सीईओही आपापल्या कंपनीच्या माध्यमातून मायदेशाला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.

गुगलचे सीईओ असलेल्या सुंदर पिचाई यांनी १३५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. गुगल युनिसेफ आणि गेट इंडिया यांच्यामार्फत ही मदत पुरविणार आहे. गेट इंडियाच्या मार्फत संकटग्रस्तांना आपला दैनंदिन खर्च भागविता यावा यासाठी रोख स्वरूपात मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर युनिसेफच्या माध्यमातून ऑक्सिजन आणि चाचणी उपकरणांसह वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय गुगलचे वैद्यकीय पथकही भारताला सर्व ती मदत करऱ्यासाठी सज्ज असल्याचे पिचाई यांनी सांगितले. एका ट्वीटद्वारे त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

मायक्रोसॉफ्टचे सीईओ असलेल्या सत्या नाडेला यांनीही ट्वीट करून भारतामधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. या कठीणप्रसंगी भारताला सर्व ती मदत करऱ्यासाठी मायक्रोसॉफ्ट प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. देशाला आज ऑक्सिजन आणि त्यासाठीच्या उपकरणांची सर्वाधिक गरज असून ती पूर्ण करऱ्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्रांच्या खरेदीसाठी मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गुगलतर्फे १३५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. यातील काही मदत ही रोख स्वरूपात तर काही मदत ही वैद्यकीय उपकरणांच्या स्वरूपात देण्यात येणार आहे.  मायक्रोसाॅफ्टनेही भारताला शक्य ती सर्व मदत देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मुख्यत: ऑक्सीजनसाठीची उपकरणे ही खरेदी करून पुरविली जाणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.

टॅग्स :googleगुगलcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत